शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

पुसेगावमधील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला

By admin | Published: November 23, 2014 8:39 PM

अवकाळीची कृपा : विहिरींना पाणी वाढल्याचे शेतकरी आनंदीत

पुसेगाव : जिहे-कठापूर योजनेअंतर्गत काटकरवाडी (जयपूर) ता. खटाव येथील येरळा नदीवर बांधलेला केटी वेअर बंधारा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पूर्ण क्षमतेने भरला आहे. सुमारे एक दशलक्ष घनफूट एवढा पाणी साठा झाला असून, परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. २०१२ मध्ये बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची लांबी ६४ मीटर तर उंची जमिनीखाली ८.५ मीटर व जमिनीवर चार मीटर इतकी आहे. एक दशलक्ष घनफूट इतकी पाणी साठवण क्षमता या बंधाऱ्याची असून, या पाण्यामुळे येरळा नदीकाठचे सुमारे २७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. तसेच पुसेगाव व काटकरवाडी या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी या बंधाऱ्याजवळ असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही.या बंधाऱ्याची टॉप लेवल २.५ मीटर असल्याने व ग्रामस्थांच्या मागणीनुसार बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस पाईप रेलिंग बसवल्याने पुराच्यावेळी शेतकऱ्यांना नदीच्या पलीकडील शिवारात ये-जा करणे तसेच ट्रॅक्टर, बैलगाडीची ने-आण करणे सहज सोपे झाले आहे.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हा बंधारा पूर्णक्षमतेने भरला असून, विहिरींना पाणी वाढले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)काटकरवाडी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यात पाणीसाठा झाला आहे. हिवाळ्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. याबरोबरच विहरींच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे.