शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

आंबेनळी घाटात सहलीच्या बसला अपघात, विद्यार्थ्यांना सुरक्षित काढले बाहेर

By सचिन काकडे | Updated: February 22, 2025 14:16 IST

विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टाळला.

सातारा : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात शनिवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सहल घेऊन आलेल्या एसटी बसला अपघात झाला. विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टाळला.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेली एसटी बस (एमएच ४० एक्यू ६२२५) प्रतापगडाहून महाबळेश्वरकडे निघाली होती. बसमधून ६० विद्यार्थी प्रवास करत होते. वाडा कुंभारोशी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर येताच एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याकडेला कलली. एसटीची चाके मातीच्या ढिगार्‍यात रुतून बसल्याने बस पलटी होता होता वाचली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने आपत्कालीन दरवाजातून बाहेर सुरक्षित काढण्यात आले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. 

अचानक झालेल्या या अपघातामुळे विद्यार्थी मात्र भयभीत झाले. काही वेळात चालकाने बस रस्त्यावर सुरक्षित काढली. यानंतर विद्यार्थ्यांसह बस महाबळेश्वरकडे मार्गस्थ झाली. या अपघातामुळे घाटात काही वेळ वाहतूक थांबली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात