शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

खंबाटकी घाटात चालकाने बस डोलविली!

By admin | Published: September 30, 2015 9:19 PM

प्रवाशांच्या जिवाशी खेळ : बेदरकार गाडी चालवून आनेवाडी टोलाक्यावरचा रॉड तोडला; कडक कारवाई करण्याची प्रवाशांकडून मागणी

सातारा : सातारा-पुणे विनाथांबा गाडी कात्रज, खंबाटकी घाटातून गाडी बेलगामपणे चालवून प्रवाशांचा जीवाशी खेळ केला. एवढ्यावरही न थांबता त्याने आनेवाडी टोलनाक्यावरील रॉड तोडून नुकसान केले. त्याला सावकाश गाडी चालविण्यास सांगितले तर त्याने प्रवाशांशीच उद्धट वर्तन केले. यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.सातारा आगाराची स्वारगेट ते सातारा ही बस (एमएच १४ बीटी ४२०३) घेऊन चालक आर. जी. शिर्के रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सातारच्या दिशेने निघाले. विनाथांबा बस असल्याने स्वारगेटमधूनच गाडी भरली होती. रांगेत उभे राहून थकलेल्या अनेक प्रवाशांनी गाडी सुरू झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु, काही वेळेत काहीतरी गडबड असल्याचे जाणवले.गाडीने कात्रज सोडल्यानंतरच हेलकावे खाण्यास सुरूवात केली. प्रमाणापेक्षा जास्त वेग घेतला असल्याचे पाठीमागे बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी जावून चालकाला गाडी सावकाश चालविण्याची विनंतीही केली. पण त्याने काही ऐकले नाही. उलट ‘तुम्हाला या गाडीत कोणी बसायला सांगितलं नाही,’ असं म्हणून उद्धट वर्तन केले. चालकाचे मुक्ताफळे एकल्यानंतर आपणच चूक केली, असं वाटू लागल्याने संबंधित प्रवासी जागेवर येऊन बसले.कात्रज आणि खंबाटकी घाटात गाडी दोन वेळा रस्ता सोडून कडेला गेली. वळणावर तरच फारच धोकादायक वळण घेतले. त्यामुळे अपघात होता-होता थोडक्यात वाचले. त्यानंतर सर्वच प्रवाशांचा थरकाप उडाला. महामार्गावरही अनेक वेळा रस्ता सोडून गाडी खाली गेली. चालकाने खरा प्रताप तर पुढेच केला. या प्रवासादरम्यान गाडी जवळून नेल्याच्या कारणावरुन एका कारचालकाशी त्याचे वाद झाले. त्या कार चालकाला धडा शिकविण्यासाठी एसटी सुसाट दामटत आनेवाडी गाठली. टोलनाक्याजवळ गाडी आली तेव्हा नियंत्रण न राहिल्याने तेथील रॉडही तोडला, असा आरोप संबंधित गाडीतून प्रवास करत असलेल्यांनी केला आहे. (प्रतिनिधी) कारमधील लोकांना मारहाणप्रवासात किरकोळ कारणावरुन कारचालकाशी वाद झाला. त्यांना धडा शिकविण्यासाठी एसटी चालकाने गाडी सुसाट पळवत आनेवाडी गाठली. संबंधित चालकाचे गाव आनेवाडीजवळ असल्याने गावातील तरुणांना रस्त्यावर बोलावून थांबण्यास सांगितले. त्यानंतर कारमधील माणसांनाही मारहाण करण्यात आली. यासंदर्भात सातारा बसस्थानकातील नियंत्रण कक्षात बसमधील तीन प्रवाशांनी लेखी तक्रार दिली आहे.