लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर असणारे राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बुधवारी दुसºया दिवशीही सातारा बसस्थानकात आंदोलनस्थळी थांबून होते. त्यामुळे दुसºया दिवशीही लाल परी जाग्यावरच होती. साताºयातील या आंदोलनात सुमारे एक हजार कर्मचाºयांचा सहभाग राहिला आहे. तसेच येथेच दुपारच्यावेळी सर्व कर्मचारी भजनात रमले तर काहींनी किक्रेट खेळण्याचा आनंदही लुटला. दरम्यान, बसस्थानकात क्रिकेटचा खेळ तर रस्त्यावर खेळखंडोबा अशी चर्चा येणाºया प्रवाशांतून सुरू होती.मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक तसेच इतर कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राज्याबरोबरच साताºयातही या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यातील ११ आगारांच्या ठिकाणीही हे आंदोलन सुरू आहे. सातारा बसस्थानाकातील बेमुदत संपात सुमारे एक हजार कर्मचाºयांचा सहभाग आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एकही लाल परी सुरू झाली नव्हती. तशीच स्थिती बुधवारी दुसºया दिवशीही राहिली.सातारा बसस्थानकात सर्वच फलाटावर व गाड्या बाहेर जाण्याच्या मार्गावर एसटी उभा केली आहे. बसस्थानकात कर्मचाºयांशिवाय कोणीही दिसत नाही. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बसस्थानकात शुकशुकाट जाणवत आहे. अधूनमधून एखादा प्रवासी येऊन एसटी सुरू झाली का नाही, याची चौकशीही करत असल्याचे दिसत आहे.बुधवारी दुपारी तर काही कर्मचाºयांनी भजन म्हणण्यास सुरुवात केली. तर विनाथांबा एसटी सुटणाºया फलाटासमोर चक्क क्रिकेटचा खेळ रंगला होता. तर बाहेर प्रवासी वाहनांची वाट पाहात उभेहोते.प्रशासनाने उपलब्ध केलेल्या वाहनांचा वापर करण्याचे आवाहनसातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारला असून, प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर करावा, असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकाºयांनी केले आहे. सध्या दीपावली सण सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करीत असतात. अशा प्रवाशांची संपामुळे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने सातारा आणि कºहाड उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांमार्फत खासगी प्रवासी बसेस, काळ्या-पिवळ्या जीप, स्कूल बसेस आदी अधिग्रहीत केलेल्या आहेत. बसेस सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख बस थांब्यावर उपलब्ध आहेत. नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या खासगी प्रवासी वाहनांचा वापर करावा, असे आवाहनही अप्पर जिल्हा दंडाधिकाºयांनी केले आहे. ंशशिकांत शिंदेंची भेटआमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा बसस्थानकात येऊन एसटीच्या कर्मचाºयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाºयांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.जेवणाची सोय...आंदोलन सुरू असल्याने राज्यातील इतर आगारातील चालक, वाहक साताºयात आहेत. तेही या आंदोलनात सामील झाले आहेत. त्यांच्या जेवणाची सोय साताºयातील कर्मचाºयांकडून केली जात आहे.खासगी वाहने सुसाट...एसटी बंद असल्याने बसस्थानकाकडे कोणी येत नाही. खासगी प्रवासी वाहतूक करणारे चालक, वाहक अशा प्रवाशांना घेऊन जात आहेत. त्यासाठी प्रवाशांकडून जादा पैसे घेण्यात येत आहेत.
बसस्थानकात खेळ.. रस्त्यावर खेळखंडोबा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:15 AM