शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

पोटपाण्याचा व्यवसायही पाण्यात

By admin | Published: December 09, 2015 1:10 AM

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा : मासेमारी,नौकाविहाराला अटकाव; अधिसूचनेत बदल करण्याची मागणी

मेढा : संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना धरणात तापोळा, कांदाटी, सोळशी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या काही जणांना अजून त्याचा मोबदला मिळाला नाही की त्यांचे पुनर्वसन झाले नाही. जलाशयात हे शेतकरी मासेमारी, बोटिंग, हॉटेल व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजरान करीत आहेत. मात्र गृह विभागाच्या अधिसूचनेमुळे पोलीस प्रशासन या शेतकऱ्यांना त्रास देत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अ‍ॅड. महेश गोरे व शेतकऱ्यांनी या अधिसूचनेत बदल करावा अशा आशयाचे निवेदन दिले असून, त्या निवेदनात म्हटले आहे की, कोयना जलाशयात जावली, पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, काही शेतकरी, कुटुंबे, भूमिहीन झाली असून, त्यांना मोबदला मिळाला नाही. की त्यांचे पुनर्वसन झाले नाही. तापोळा, कांदाटी, सोळशी खोऱ्यातील असे शेतकरी उदरनिर्वाहासाठी नौकाविहार, मासेमारी, इकोटुरिझम व इतर पूरक व्यवसाय करीत आहेत.परंतु, कोयना धरणाच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहविभागाने १९७२ साली एक अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेनुसार शिवसागर जलाशयात नौकाविहार व मासेमारीला पोलिसांकडून अटकाव केला जात आहे. जमिनी पाण्यात गेली उत्पन्नाचे दुसरे साधन नाही अशा परिस्थीतीत गृह विभागाच्या या अधिसूचनेमुळे या प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली असून, या अधिसूचनेत बदल करावा, अशी मागणी या कोयना प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.नैसर्गिक साधन संपन्न व कोयना जलाशयावरच या खोऱ्यातील जनता अवलंबून आहे. वानवली गावचे सुपुत्र व लालबाग परळचे माजी आमदार दगडुदादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारला असून, विदर्भ-मराठवाड्यासारखी इथल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी काही नियम व अटी शर्थीना अनुसरून गृहविभागाच्या अधिसूचनेत बदल करावा, अशी मागणी मंत्रिस्तरावरही करण्यात येणार आहे.मिनी काश्मीर म्हणून ‘तापोळा’ समजले जाते नौकाविहारासाठी आणि निसर्गाचा आस्वाद लुटण्यासाठी जगभरातले पर्यटक पर्यटनासाठी तापोळा खोऱ्यात येतात. गृह विभागाच्या अधिसूचनेने पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात खीळ बसणार आहे. धरणाच्या भिंतीपासून दहा कि़ मी. पर्यंतचा परिसर निषिध्द करण्यात यावा व परिसराचा चतु:सिमासहीत नकाशा तयार करून धरणाला बाधा निर्माण होऊ नये यासाठी तज्ञांची मतेही विचारात घ्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.गृह विभागाच्या अधिसूचनेमुळे कोयना प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी धरणासाठी केलेला त्याग लक्षात घेऊन या अधिसूचनेत बदल करावा, अशी मागणी अ‍ॅड. महेश गोरे, आनंद सकपाळ, सचिव विशाल सकपाळ, दिनेश सकपाळ, ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण सकपाळ, विजय शेलार, गंगाराम सकपाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन केली आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ नको!नैसर्गिक साधन संपन्न व कोयना जलाशयावरच या खोऱ्यातील जनता अवलंबून आहे. वानवली गावचे सुपुत्र व लालबाग परळचे माजी आमदार दगडुदादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारला असून, विदर्भ-मराठवाड्यासारखी इथल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी काही नियम व अटी शर्थीना अनुसरून गृहविभागाच्या अधिसूचनेत बदल करावा, अशी मागणी मंत्रिस्तरावरही करण्यात येणार आहे. या हालचाली वेगाने होवून या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.