शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

चोरीचे सोने खरेदी; सराफासह दोेघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:18 PM

सातारा : शहरातील बुधवार पेठेत तीन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, चोरीचे सोने विक्री व खरेदी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये साताऱ्यातील एका ज्वेलर्सच्या मालकाचा समावेश आहे.ज्वेलर्स मालक मोतीलाल जेठमल जैन (वय ५९, शनिवार पेठ, सातारा), सुरेखा सुभाष पवार (४०, आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) ...

सातारा : शहरातील बुधवार पेठेत तीन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, चोरीचे सोने विक्री व खरेदी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये साताऱ्यातील एका ज्वेलर्सच्या मालकाचा समावेश आहे.ज्वेलर्स मालक मोतीलाल जेठमल जैन (वय ५९, शनिवार पेठ, सातारा), सुरेखा सुभाष पवार (४०, आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, सोमवारी दुपारी बुधवार पेठेतील शकील इस्माईल बन्ने यांच्या बंद बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील एक लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून या चोरीचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे ४० ग्रॅम सोने व १४१ ग्रॅम चांदी असा एकूण ८३ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यातील एका मुलाने चोरी करून आणलेली सोन्याची बांगडी आपल्या आईला दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाच्या आईकडे आपला मोर्चा वळविला. सुरेखा पवार हिच्याकडे पोलिसांनी तपास केल्यानंतर यामध्ये आणखी नवी माहिती समोर आली. पवार हिने सोन्याची बांगडी मोतीलाल जेठमल जैन यांच्या ‘गुलाबजी हिंदुजी ज्वेलर्स’ या दुकानात विकून नवीन सोने खरेदी केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ज्वेलर्स मालक मोतीलाल जैनलाही अटक केली.सुरेखा पवारकडून १० ग्रॅमचे ३१ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस नाईक प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, संतोष लेंभे, श्रीनिवास देशमुख, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, धीरज बेसके, प्रीती माने यांनी सहभाग घेतला.याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नसीमखान फरास करीत आहेत.मुलाच्या गुन्ह्यांवर आईकडून पांघरूणसंबंधित दहा वर्षांची दोन मुले साताºयातील एका शाळेत शिकत आहेत. त्यांनी सराईतपणे बंद बंगला फोडून दागिने चोरले. त्यातील एका मुलाने घरी गेल्यानंतर दप्तरामध्ये दागिने लपवून ठेवले होते. हे दागिने कोठून आणले, हे विचारणे सोडून आईने त्याच्या कृत्यावर पांघरूण घालून त्याच्याकडील सोन्याची बांगडी आपल्याजवळ ठेवली. एवढेच नव्हे तर दागिन्यांचा मोह न आवरल्याने आईने त्या सोन्याच्या बांगडीच्या बदल्यात स्वत:ला नवे दागिने केले. मुलाला दाटण्याचे सोडून आईने मोहापायी स्वत:लाही गैरकृत्यात सामील करून घेतल्याने पोलीसही अवाक् झाले.