शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

सातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द , सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 7:29 PM

गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ३७६ जणांच्या नोकर भरतीची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश महारष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने दिला. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून आमदार जयकुमार गोरे गटाने आनंद व्यक्त केला तर केवळ राजकीय आकसापोटी सरकारने ही चुकीची कारवाई केली, असा गंभीर आरोप बँकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा आदेशआमदार जयकुमार गोरे गटाकडून आनंदराजकीय आकसापोटी चुकीची कारवाई केल्याचा बँकेकडून आरोप

सातारा : गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ३७६ जणांच्या नोकर भरतीची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश महारष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने दिला. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून आमदार जयकुमार गोरे गटाने आनंद व्यक्त केला तर केवळ राजकीय आकसापोटी सरकारने ही चुकीची कारवाई केली, असा गंभीर आरोप बँकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी नेत्यांच्या ताब्यात असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षी मोठी नोकर भरती केली होती. याच बँकेत संचालक असलेले जयकुमार गोरे यांनी या नोकर भरतीच्या विरोधात उपोषणही केले होते. त्यानंतर बोराटवाडीतील त्यांच्या एका कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात या प्रक्रियेविरुद्ध धावही घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने या प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिले होते.त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने संपूर्ण चौकशी करून बुधवारी अप्पर मुख्य सचिवांच्या सहीने आदेश काढला आहे. 'सचोटी, पारदर्शकता, पावित्र्य अन् बँकेचे हित या सर्व बाबींचा विचार करून ही नोकरभरती रद्द करण्याचा निर्णय घेतला ,' असे या आदेशात म्हटले आहे.सरकारच्या या निर्णयाबाबत बँकेचे संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. 'सत्ताधारी मंडळींच्या हिटलरशाहीतून झालेल्या भ्रष्टाचाराला या निर्णयामुळे सुरुंग लागला,' अशी प्रतिक्रिया गोरे यांनी व्यक्त केली.दरम्यान जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली. 'बँकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकीय आकसापोटी भाजप सरकारने हा चुकीचा निर्णय घेतला. या विरोधात आम्ही जरूर कार्यवाही करू,' अशी भूमिका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडली.

टॅग्स :bankबँकSatara areaसातारा परिसर