शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

साताऱ्यात आघाडीचा उमेदवार ठरेना; माढ्यावर अजित पवार गटाचाही दावा...

By नितीन काळेल | Updated: March 6, 2024 22:04 IST

लोकसभा निवडणुकीसाठी बैठकांना जोर; जागा वाटपाचा पेच

सातारा: लाेकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या बैठकावर बैठका होत असून अजूनही अनेक मतदारसंघाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे जागा वाटपाचा पेच कायम आहे. अशातच सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच लढणार असलीतरी शरद पवार गटाचा उमेदवार ठरलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पुन्हा सातारा, माढ्यावर दावा केल्याने राजकीय तिढा वाढला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि माढा हे लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ नेहमीच चर्चेत येतात. यावेळीही पेच निर्माण झालेला आहे. याला कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील फाटाफूट. या पार्श्वभूमीवरच आताची निवडणूक होत आहे. सातारा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाणार आहे. पण, या गटाचा उमेदवार ठरता ठरेना. त्यातच बुधवारी विशेष हेलिकाॅप्टरने खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर मुंबईला गेले. तेथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली. पण, चाचपणी आणि चर्चे व्यतीरिक्त काहीच झाले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचा उमेदवार कधी ठरणार हे स्पष्ट नाही. मात्र, साताऱ्यात महाविकास आघाडीची बैठक झाली. त्याला ३८ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातून आघाडीने एकसंधपणा राखत वज्रमूठ तरी आवळल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीत राष्ट्रवादीचा अजित पवार गट सामील आहे. या गटाची सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत मुंबईत बैठक झाली. यावेळी पदाधिकारी व नेत्यांनी दोन्ही मतदारसंघ लढविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जागा वाटपाचा निर्णय काही दिवसांत होईल. तोपर्यंत निवडणुकीच्या तयारीला लागा, असे फर्मानच सोडले आहे. त्यामुळे अजित पवार गटाची भूमिका कायम राहिली तर भाजपसाठी कठीण परीक्षा असणार आहे. कारण, साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले हे आणि माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर पुन्हा तयारीत आहेत. अजित पवार गटाच्या भूमिकेवरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे महायुतीत तरी सातारा आणि माढ्याचा पेच वाढत असल्याचे समोर येत आहे.

साताऱ्याची लढत उमेदवार कोण यावर ठरणार ?सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून अजुनही कोणताही उमेदवार स्पष्ट नाही. खासदार श्रीनिवास पाटील हेच सध्यातरी प्रबळ ठरु शकतात. पण, त्यांचे वयोमान पाहता पक्षाला दुसरा उमेदवार शोधावा लागेल. पण, तो ताकदीचा असावा लागणार आहे. तरच निवडणुकीत टीकाव धरता येईल. तर सातारा युतीत अजित पवार गटाकडे गेल्यास त्यांच्यापुढे अनेक पर्याय असलेतरी शरद पवार गटाचा उमेदवार कोण यावरच दादा गटाच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर युतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने साताऱ्यावर दावा केला होता. पण, सध्यातरी या गटाकडून काहीच हालचाल नाही.

टॅग्स :satara-pcसाताराsatara-acसाताराlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक