शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

राजधानी सज्ज !

By admin | Published: October 03, 2016 12:29 AM

पाचवडच्या मुख्य चौकालाच शिवाजी महाराजांचे नाव

सातारा : गेल्या एक महिन्यापासून गाजत असलेला दिवस अखेर जवळ आला. होय... ३ आॅक्टोबर. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या छत्रपतींच्या राजधानीतील ‘मराठा महामोर्चा’च्या आदल्या दिवशी साताऱ्यात तयारी पूर्ण झाली. वातावरण निर्मितीसाठी भगवे झेंडे घेऊन गल्लीबोळापासून डोंगर कपारीपर्यंत मोठ्या उत्साहानं तरुणाई फिरत होती तर दुसरीकडे लाखोंचा जमाव साताऱ्यात आल्यानंतर कशा पद्धतीनं सज्ज असलं पाहिजे, याचं नियोजन करण्यात पोलिस खातंही पूर्णपणे गुंतलं होतं. गावोगावच्या ग्रामसभांमध्ये फक्त महामोर्चाचे ठराव! गाव बंद ठेवण्याचा निर्धार : गावच्या सुरक्षेवरही सर्वव्यापी चर्चा सातारा : महात्मा गांधी जयंतीदिनी गावोगावी ग्रामसभा घेतल्या जातात. साताऱ्यात सोमवारी मराठा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात संपूर्ण गावाने सहभागी होण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. शंभर टक्के गाव बंद ठेवून महामोर्चात सहभाग वाठार स्टेशन : साताऱ्यातील महामोर्चा यशस्वी करण्यासाठी शंभर टक्के गाव बंद ठेवून लोकांनी या महामोर्चात सहभागी व्हावं. यासाठी रविवारच्या प्रत्येक गावातील ग्रामसभेतून ठरावांना मंजुरी घेण्यात आली. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वच गावांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशा मागण्या केल्या. वाठार स्टेशन येथे सरपंच महेश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत मराठा आरक्षणबाबत ठराव करण्यात आला. यावेळी शेकडो ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देऊर येथे सरपंच नीलिमा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत मराठा आरक्षण ठराव मंजूर करण्यात आला. यासह पिंपोडे बुद्रुक, वाघोली, तडवळे, पिंपोडे खुर्द, दहिगाव, अंबवडे, रेवडी, पळशी, गुजरवाडी, बिचुकले, तळिये, विखळे, जाधववाडी, फडतरवाडी, बनवडी, आरबवाडी, दुधनवाडी, आसनगाव, शहापूर, अनपटवाडी गावांमध्येही ग्रामसभेत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. चर्चेत शेकडो ग्रामस्थ, युवक, महिलांनी सहभाग घेतला. पाचवड : साताऱ्यात निघणाऱ्या महामोर्चासाठी गावोगावी, वाडी-वस्त्यांवर मराठा बांधवांच्या बैठका झाल्या. महामोर्चासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचा ठराव पाचवडसह परिसरात रविवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला. दरम्यान, महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौकालाच शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. पाचवड, अमृतवाडी, चिंदवली, उडतारे, खडकी, कळंभे, आसले, कडेगाव, व्याजवाडी, अनवडी, चांदवडी, भिवडी, जांब, निकमवाडीसह परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये मराठा महामोर्चात सहभाग व मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल ठराव करण्यात आला.