महाबळेश्वर : ‘वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिलेल्या प्लास्टिक बंदीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून करण्यात येणार असून, पालिकेने जप्ती व दंडात्मक कारवाईसाठी चार पथकांची स्थापना केली आहे. व्यापारी बंधू ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवून पालिकेला सहकार्य करावे,’ असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, जास्त जाडीच्या प्लास्टिक कॅरिबॅगमागे प्रति पाच रुपये शुल्क आकारून त्यांची नोंद ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलात करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यटन विकास महामंडळाने महाबळेश्वर या पर्यटनस्थळाचा केलेला विकास आराखडा व वन व्यवस्थापन समितीने केलेल्या पर्यटनस्थळांच्या सुशोभीकरणाची पाहणी करण्यासाठी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे हे नुकतेच महाबळेश्वर येथे आले होते. या संदर्भात ‘हिरडा’ विश्रामगृहावर विविध विभागांच्या प्रमुख अधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असून, देखील बाजारपेठेतील दुकाने टपरी स्टॉल हातगाडी आठवडे बाजार विविध पॉइंट अशा सर्वच ठिकाणी प्लास्टिक पिशव्याचा वारेमाप वापर केला जात असल्याबाबत विकास खारगे यांनी चिंता व्यक्त केली होती. पर्यटनस्थळाचे व येथील पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन १ नोव्हेंबरपासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात केलेल्या माहिती पत्रकांचे वाटप झाले. शहरातील विक्रेत्यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. तसेच त्यापेक्षा जाडीच्या कॅरिबॅगचा वापर करावा तसेच अशा पिशव्यांचा पुनर्वापर करावा दुकानदारांनी अशा जाड प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना सश्ुाल्क उपलब्ध करून द्यावी. प्रतिकॅरिबॅग पाच रुपये शुल्क आकारून त्यांची नोंद ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलात करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहितीही मुख्याधिकारी पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)जाडी मोजण्यासाठी डिजिटल यंत्रप्लास्टिक अथवा थर्माकोलच्या थाळ्या, चहाचे कप, ग्लास आदी वस्तूंची निर्मिती करणे, त्यांची साठवण अथवा विक्रीवर प्रतिबंध ठेवण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार तर दुबार गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड ठोवण्यात येणार आहे. या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी पालिकेने चार पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकाचे नेतृत्व अधिकारी करणार असून, या पथकाकडे कॅरिबॅगची जाडी मोजण्यासाठी डिजिटल यंत्र देण्यात येणार आहे.व्यापाऱ्यांना नियमावलीची माहिती मिळणार ‘एमएमएस’द्वारेप्लास्टिक बंदी संदर्भातील नियमावलींची माहिती व त्यामध्ये केली जाणारी दुरुस्ती यांची माहिती शहरातील व्यापाऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे दिली जाणार आहे. या सेवेचा शुभारंभ ‘एसएमएस’ने करण्यात आला. प्लास्टिक बंदी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, याची माहिती ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.
बंदी प्लास्टिकची; भुर्दंड ग्राहकांना
By admin | Published: October 21, 2015 9:42 PM