पाच हजारांपेक्षा जास्त किमतीचा माल हस्तगतलोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा सूचना देऊनही पिशव्या वापरणाºयांवर कºहाड पालिका व एनव्हायरो क्लबच्या सदस्यांकडून कारवाई केली जात आहे. अशीच कारवाई रविवारी सायंकाळी येथील यशवंत हायस्कूल परिसरात दोन दुकांनावर करण्यात आली. त्यामध्ये सुमारे साडे पाचशे किलो पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.पालिका व इन्व्हायरो क्लबच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्लास्टिक पिशव्या जप्तीची धडक कारवाई राबविण्यात आली.यावेळी पालिका अभियंता ए. आर. पवार, पालिका आरोग्य विभाग अधिकारी मिलिंद शिंदे, आर. डी. भालदार, देवानंद जगताप, रामचंद्र भिसे, नगरसेवक विजय वाटेगावकर, इन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद, चंद्र्रकांत जाधव, रमेश पवार यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालिका अधिकारी देवानंद जगताप, रामचंद्र भिसे, एनव्हायरो क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद, चंद्रकांत जाधव, रमेश पवार यांनी शनिवार पेठ येथील बाजारपेठेत कारवाईची मोहीम राबविली. यावेळी दोन दुकानांतून तब्बल साडेपाचशे किलो इतका पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडी असलेला प्लास्टिक पिशव्या त्यांना आढळल्या. एका दुकानांतून दहा किलो तर दुसºया पाचशे सत्तर किलो इतक्या पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या कारवाई करून पालिका अधिकारी व सदस्यांनी जप्त केल्या. घटनेची माहिती पालिका अधिकारी देवानंद जगताप यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे व अभियंता ए. आर. पवार यांना दिली. त्यानंतर ए. आर. पवार, आर. डी. भालदार, मिलिंद शिंदे यांनी कारवाई करण्यात आलेल्या संबंधित ठिकाणी भेट दिली. ए. आर. पवार यांनी पंचनामा केला. पालिका अधिकाºयांकडून वारंवार सूचना करूनही प्लास्टिक पिशव्या विक्री बंद केली जात नसल्याने कारवाई केली. जप्त पिशव्या घंटा गाडीतून पालिकेत आणल्या.
कºहाडात साडेपाचशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:40 AM