शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कार अन् टेम्पोचा भीषण अपघात, दोन ठार तर दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 6:34 PM

शिरवळजवळ दुर्घटना; मृतांमध्ये राज्य खो-खो असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष व फलटणच्या नगरसेवकाचा समावेश

शिरवळ (सातारा) : आशियाई महामार्ग 47 वर खंडाळा तालुक्यातील शिरवळ हद्दीत फूल मळ्याजवळ रविवारी सायंकाळी कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर एकजण गंभीर व एक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला. 

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार पी. जी. शिंदे (वय 77)आणि फलटण येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार (65) जागीच ठार तर माजी नगराध्यक्ष अशोकराव देशमुख (65, तिघे रा. फलटण) गंभीर तसेच अशिष लोंढे (29) हे जखमी झाले आहेत. देशमुख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. शिरवळ पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून बेंगलोर बाजूकडे टेम्पो (एमएच 04 एफजे 8038) निघाला होता. टेम्पो शिरवळ हद्दीत फूल मळ्याजवळ आला असता पाठीमागून पुणे बाजूकडून फलटणकडे भरधाव वेगाने निघालेली कारने (एमएच 11 सीजी 9394) पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारमधील पी. जी. शिंदे आणि फलटण येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार हे जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून पुणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर देशमुख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्याला हलविण्यात आले.

 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरDeathमृत्यू