शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

Satara News: विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या कारला आग, सुदैवाने जिवीतहानी टळली; कार जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:52 PM

मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या शाळेच्या कारला अचानकपणे आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ...

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या शाळेच्या कारला अचानकपणे आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र कारआगीच्या भक्ष्यस्थानी पडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेडगेवाडी येथून वाठार कॉलनी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेवून येत असताना कारमधून अचानक धूर निघाला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. चालकाने प्रसंगावधान दाखवीत तात्काळ कारमधील ८ ते १० विद्यार्थ्यांना बाहेर काढत सुरक्षितस्थळी नेले. दरम्यान, आगीने पेट घेतल्याने आगीचे लोळ पसरले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली. आगीत कार संपूर्ण जळून खाक झाली. दरम्यान, कारला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, घटनास्थळी लोणंद पोलिसांनी धाव घेतली.  या अपघाताने कारच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षीतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगcarकारStudentविद्यार्थी