शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

Satara News: खंबाटकी नजीक कॅनॉलमध्ये कार कोसळली, पोलिस-ग्रामस्थांमुळे जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 7:53 PM

खंडाळा पोलिसांची तत्परता..

मुराद पटेलशिरवळ : आशियाई महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटात असणाऱ्या धोम-बलकवडीच्या कँनाँलमध्ये लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघांपैकी एकाला कारने धडक देत कार कँनाँलमध्ये कोसळली. खंडाळा पोलिस व नागरिकांच्या तत्परतेने कारमधील लहान मुलासह पाच जणांना व अपघातग्रस्त गंभीर जखमी युवकाचा जीव वाचविण्यात यश आले. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्याहून डफळपूर ता.जत या ठिकाणी निघालेले राहुल भाग्यवंत उबाळे (वय २५) व अविनाश भाग्यवंत उबाळे (२९) हे दोघे भाऊ लघुशंकेसाठी कॅनॉल लगत थांबले होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार (क्र.एमएच-१२- टिवाय-१०६६) ने राहुल व अविनाशला धडक दिली. यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. धडकेत राहुल गंभीर तर अविनाश किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू अहिरराव, प्रविण मंहागडे, पोलिस अंमलदार विजय पिसाळ, दत्तात्रय धायगुडे, अतुल आवळे, संजय पंडित, सचिन शेलार, उद्धव शिंदे व कर्मचारी, महामार्ग पेट्रोलिंग पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कारमधील चालक श्रीपती श्रीमंत शिंदे (४२), श्रीमंत शिंदे (७०), राजश्री श्रीपती शिंदे (३७), संकेत श्रीपती शिंदे (१३), संस्कृती श्रीपती शिंदे (८ सर्व रा.अथनी, ता.बेळगाव,सध्या रा.पुणे) या पाच जणांना कारमधून बाहेर काढले.दरम्यान,गंभीर जखमी झालेल्या राहुल उबाळे याला अधिक उपचाराकरीता पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव हे करीत आहेत.खंडाळा पोलिसांची तत्परता..कार कँनाँलमध्ये कोसळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ कारमधील प्रवाशांना व गंभीर जखमी युवकाला आपल्या जीपमधून रुग्णालयात दाखल केल्याने संबंधितांचा जीव वाचविण्यात यश आले. तर पाण्याच्या प्रवाहात वाहून तब्बल एक किलोमीटर वाहून गेलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात