नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील नागठाणे येथील चौकात शिवशाही बस आणि कारचा अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहनचालक जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.
याबाबत माहिती अशी की, चंदन सुर्यकांत शिंदे (रा. खोजेवाडी, ता. सातारा) हे शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कार (एमएच ११ सीजे १०१०) मधून नागठाणे येथील चौकातून महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी कºहाडकडून साताºयाकडे भरधाव निघालेली शिवशाही बस (एमएच ४७ वाय ०९५३) बसने कारला जोराची धडक दिली. त्यानंतर शेजारील टेम्पोस ही बस घासली. बसची धडक एवढी भीषण होती की अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. तरसेच दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच बोरगावचे पोलीस मनोहर सुर्वे आणि कर्मचारी अपघात ठिकाणी दाखल झाले. शिवशाही बस चालक अजय सोपान आवारे (वय ३८, रा. अजनूज ता. खंडाळा) यास ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद कार चालक चंदन शिंदे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस हवालदार मनोहर सुर्वे तपास करीत आहेत.