मलकापूर : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर गुरुवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाचा ताबा सुटून वाठार गावच्या हद्दीत कार महामार्गावरच पलटी झाली. तर पाचवड फाटा परिसरात मिनी बस दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार (एमएच १० डीजी २४०४) चा चालक कोल्हापूरकडे निघाला होता. पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत आला असता अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गावरच पलटी झाली. तर काही वेळाने मिनी बस (एमएच २३ वाय ६०६०) ही कोल्हापूरच्या दिशेने जात आसताना पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर पाचवड फाटा परिसरात आली असता चालकाचा ताबा सुटल्याने बसची दुभाजकाला धडक बसली.
या दोन्ही अपघातात वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या दोन्हीही अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, अशोक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी व देखभाल विभागाचे कर्मचारी आणि कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
२३मलकापूर
पुणे-बेंगलोर महामार्गावर अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. (छाया : माणिक डोंगरे)
230921\1751-img-20210923-wa0032.jpg
फोटो कॕप्शन
अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गिवरच पलटी झाली. (छाया माणिक डोंगरे)