सातारा - जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर रेल्वे यंत्रणेकडून सिग्नल न मिळाल्याने मालवाहतूक करणारी रेल्वे पटरी सोडून चुकीच्या पटरीवर धावली. या प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मंगळवारी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे इंजिन चालक कराड येथे रेल्वे स्थानक परिसरात गाडी घेऊन आले असता या ठिकाणी रेल्वे स्थानकातून सिग्नल मिळणे गरजेचे होते. मात्र, तो मिळाला नाही. त्यामुळे रेल्वे मालवाहतूक गाडी पटरी सोडून चुकीच्या पटरीवर गेली. चुकीच्या दुसऱ्या पटरीवर रेल्वे काही अंतरावर जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन थांबली. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाली नाही.