मलकापूर : सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कऱ्हाडच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
योगेश अशोक बारटक्के (वय ३५), भारती अशोक बारटक्के ( ५५ ), नीरज योगेश बारटक्के (५ सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा), अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर (एमएच ११ यू ०८२३) हा ट्रॉली क्रमांक ( एमएच ११ आर ९६५३ व ९६५४) घेऊन कऱ्हाडकडे जात होता. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत आले असता, सातारा येथून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या कार (एमएच १२ ईटी ३४३७)च्या चालकाचा ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटल्याने कारची ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात चालकासह कारमधील बारटक्के कुटुंबातील तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, रमेश खुणे, सिकंदर उघडे यांच्यासह महामार्ग पोलीस कर्मचारी व कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत जाधव, खलील इनामदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात पाठवून दिले. यावेळी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ उपमार्गावरून वळविण्यात आली होती. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. जखमीला रुग्णालयात पाठविल्यानंतर महामार्ग देखभालचे व महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.
फोटो
सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कऱ्हाड दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक झाली. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (छाया : माणिक डोंगरे)
140721\1333-img-20210714-wa0007.jpg
फोटो कॕप्शन
सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रॕक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक झाली. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामूळे कांहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (छाया- माणिक डोंगरे)