कऱ्हाड-तासगाव रस्त्याच्या चौपदरीचे काम सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सर्व्हिस रस्त्याचे काम अपूर्ण आहे. नाले व मोऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. मध्यंतरी कृष्णा पुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यानंतर पुलावरील रस्त्याचे काम करण्यात आले तसेच इतर कामे करून पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, पुलाच्या संरक्षक कठड्यांकडे म्हणावे तेवढे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुलाची साफसफाई केली नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला माती साचून राहिली आहे. पाऊस पडला की संपूर्ण पुलावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो. कठडा तुटल्याने रात्रीच्या सुमारास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कठड्याची दुरुस्ती बांधकाम विभागाने करावी, अशी मागणी होत आहे.
कार्वेत कृष्णा पूल बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:34 AM