खटाव : ‘कोरोनाशी लढा देऊन त्याला हरवायचे आहे. नवीन वर्षात एक संकल्प करून पाऊल ठेवत असताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत असतानाच आपापल्या आरोग्याच्या बाबतीत तपासणी करून सतर्क राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रिया शिंदे यांनी केले
खटाव येथे शुक्रवारी काडसिद्धेश्वर महाराज कोविड सेंटर कोरेगावच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर खटाव ग्रामपंचायत कार्यालयात पार पडले.
या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खटाव-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात कोविड सेंटरचे सर्व आरोग्य अधिकारी व पत्रकार बंधू व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, राहुल जमदाडे, नसीमबानू काझी, विकास कुंभार, डॉ. अजित पवार, आशासेविका, अंगणवाडीसेविका व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे राहुल जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. विकास कुंभार यांनी आभार मानले.
०१खटाव
कॅप्शन: खटावमध्ये काडसिद्धेश्वर महाराज कोविड सेंटर कोरेगाव यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रिया शिंदे, राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे आदी उपस्थित होते.