मल्हारपेठ : वारसाच्या खोट्या सह्या, बोगस नोंदी व ग्रामपंचायत रेकॉर्डचा खोटा आठ (अ)चा उतारा तयार करून त्यावरून खरेदी दस्त अस्तित्वात आणून फसवणूक केल्याप्रकरणी मारुल हवेली, ता. पाटण येथील माजी सरपंच अशोक अनंत पाटील यांच्यासह संबंधित जागेची विक्री व खरेदी करणाऱ्यांवर मल्हारपेठ पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सुनंदा विलास बारटक्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारुल हवेली, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, देसाई कारखान्याचे संचालक अशोक अनंत पाटील व संबंधित जागा खरेदी करणारे विद्या रेळेकर व जागा विक्री करणारे महादेव मारुती बारटक्के (मयत) या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.फिर्यादीच्या तक्रारीनुसार महादेव बारटक्के यांचे व्यतिरिक्त त्यांच्या घरातील कोणीही गावी राहत नसल्याचा गैरफायदा घेऊन खरेदीदार विद्या रेळेकर यांनी तत्कालीन सरपंच अशोक पाटील यांना हाताशी धरून त्यांच्या हस्ताक्षरात १५ जुलै २००५ रोजी बारटक्के कुटुंबातील व्यक्तींच्या नावाच्या खोट्या मजुकाराचा व खोट्या सह्या करून महादेव बारटक्के यांच्या नावे खुली जागा करण्याचा खरेदी दस्त करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. तपास हवालदार तानाजी भोसले करत आहेत. (वार्ताहर)खोटे रेकॉर्ड केल्याप्रकरणीमाजी सरपंचावर गुन्हामारुल हवेली : ‘आठ अ’चा उतारा तयार करून फसवणूकमल्हारपेठ : वारसाच्या खोट्या सह्या, बोगस नोंदी व ग्रामपंचायत रेकॉर्डचा खोटा आठ (अ)चा उतारा तयार करून त्यावरून खरेदी दस्त अस्तित्वात आणून फसवणूक केल्याप्रकरणी मारुल हवेली, ता. पाटण येथील माजी सरपंच अशोक अनंत पाटील यांच्यासह संबंधित जागेची विक्री व खरेदी करणाऱ्यांवर मल्हारपेठ पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सुनंदा विलास बारटक्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारुल हवेली, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, देसाई कारखान्याचे संचालक अशोक अनंत पाटील व संबंधित जागा खरेदी करणारे विद्या रेळेकर व जागा विक्री करणारे महादेव मारुती बारटक्के (मयत) या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.फिर्यादीच्या तक्रारीनुसार महादेव बारटक्के यांचे व्यतिरिक्त त्यांच्या घरातील कोणीही गावी राहत नसल्याचा गैरफायदा घेऊन खरेदीदार विद्या रेळेकर यांनी तत्कालीन सरपंच अशोक पाटील यांना हाताशी धरून त्यांच्या हस्ताक्षरात १५ जुलै २००५ रोजी बारटक्के कुटुंबातील व्यक्तींच्या नावाच्या खोट्या मजुकाराचा व खोट्या सह्या करून महादेव बारटक्के यांच्या नावे खुली जागा करण्याचा खरेदी दस्त करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. तपास हवालदार तानाजी भोसले करत आहेत. (वार्ताहर)
खोटे रेकॉर्ड केल्याप्रकरणी माजी सरपंचावर गुन्हा
By admin | Published: May 21, 2015 10:11 PM