शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कास पुष्प पठाराला वेध बहरण्याचे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:53 PM

पेट्री (सातारा) : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पुष्प पठाराला बहरण्याचे वेध लागले आहेत. पठारावर सध्या तृण, कंद, वेली, आर्किड या फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच मार्गात ठिकठिकाणी लहानमोठे धबधबे कोसळत असल्याने हौसी पर्यटकांना निसर्गाचा नजराणा अनुभवास मिळत आहे.

ठळक मुद्दे मार्गात ठिकठिकाणी लहानमोठे धबधब्यांचाही नजराणा तृण, कंद, वेली, आर्किड फुलांच्या हंगामास प्रारंभ पर्यटकांचे पावले वळण्यास सुरूवात

पेट्री (सातारा) : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पुष्प पठाराला बहरण्याचे वेध लागले आहेत. पठारावर सध्या तृण, कंद, वेली, आर्किड या फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच मार्गात ठिकठिकाणी लहानमोठे धबधबे कोसळत असल्याने हौसी पर्यटकांना निसर्गाचा नजराणा अनुभवास मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसेच दुर्मीळ फुलांमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सर्वसाधारणपणे सप्टेबर, आॅक्टोबरमध्ये असतो. परंतु, आत्तापासून काही फुले दिसू लागली आहे. कास पठार, तलाव परिसरात अल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक निसगार्चा मनसोक्त आनंद घेत आहेत. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी कास पठार परिसरात पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होताना दिसत आहे.

पठारावर चवर, टूथब्रश, कापरू, कंद, पाचगणी आमरी, भुईचक्र आदी फुले तुरळक प्रमाणात उमलण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्यासह परराज्यातून फुलांचा हंगाम सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.या पठाराचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे जून ते आॅक्टोबर या कालावधीत तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना आकर्षक अशा निळया, जांभळ्या, लाल, पांढºया रंगांची फुले येतात. मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. पठारावरील सुंदर विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो.

सध्या पांढºया रंगाची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने तसेच चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची संततधार, गुलाबी थंडी यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत दाट धुक्यांसह पावसाचा आनंद  घेत आहेत.येथे याल तर हे पहाल

पंद (पिंडा कोंकणांसीस)जमिनीत असणाºया कंदापासून ही वनस्पती उगवते. गोल बटाट्यासारखा कंद असून, त्यातून कोंब बाहेर येऊन षटकोनी आकाराची पांढºया रंगाची फुले येतात. रानडुक्कर, सायाळ आदी तृणभक्षी प्राणी ही फुले खातात.आषाढ बाहुली आमरी(हबेनारीया ग्रँडी फलोरीफलोरमीस)ही वनस्पती जांभ्या खडकात मातीच्या भागात उगवते. याची पाने लहान आकाराची असतात. ती जमिनीलगत असतात. त्यावर देठ असून त्यामध्ये दोन ते तीन फुले येतात. पांढºया रंगांच्या या फुलांचा आकार बाहुलीसारखा दिसतो.चवर (हिच्चीनीया कावलीना)

आले वर्गातील ही वनस्पती सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये दिसते. जमिनीत  हळद किंवा आलेसारखे आकाराचे कंद दिसून येतात. याच कंदातून पठारावर पांढºया रंगांची फुले उमलतात. यास चवर किंवा चवेटा म्हणतात. पाने करदळीच्या पानांसारखी लांबट असतात.