शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

जातिधर्म ‘पीराच्या देवळा’बाहेर!

By admin | Published: October 31, 2014 12:46 AM

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक : एकाच छताखाली ‘राजेवलीबाबा अन् शंभूमहादेव’ची आराधना

प्रदीप यादव - साताराजिथं मुस्लिम समाजबांधव राजेवलीबाबांसमोर दुआ मागून माथा टेकतो अन् हिंदू समाजबांधव शंभूमहादेवाला वाहतो बेलफूल, असं सर्वधर्मसमभावाचं प्रतीक म्हणजे येथील मल्हार पेठेतील ‘पीराचं देऊळ’. इथं ऊरूस भरतो तो सर्व जातीधर्मीयांना सामावून घेणारा अन् होळी पेटते ती जातीपातीची विषवल्ली भस्म करणारी. इथं हिरव्या झेंड्यालाच साखरगाठ आणि लिंबाचा पाला बांधून उभारली जाते समतेची गुढी अन् आकाशकंदिलाच्या उजेडात इथल्या माणसांची दिवाळी होते प्रकाशमान. सातारा शहरातील कर्मवीर पथाच्या बाजूला असलेल्या मल्हार पेठ याठिकाणी सामाजिक ऐक्याचं प्रतीक असलेलं ‘पीराचं देऊळ’. हिंदू-मुस्लिम समाजाचं आराध्य दैवत असणाऱ्या या देवस्थानाच्या नावातच समतेची भावना ओतप्रोत भरलेली आहे. इतकंच काय पण दोन्ही दैवतांची पूजाअर्चा करणारे पुजारी प्रकाश वायदंडे हे मातंग समाजातील आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण देवस्थानाबद्दल प्रकाश वायदंडे यांनी सांगितले की, ‘याठिकाणी राजेवलीबाबा आणि शंभूमहादेवाचं स्थान आहे. म्हणून याला ‘पीराचं देऊळ’ असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. देवळाच्या गाभाऱ्यातील भिंतीवर शंभूमहादेवाचे मोठे चित्र काढले आहे. शेकडो वर्षांपासून हे देवस्थान इथं आहे. या देवस्थानाच्या देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना केली आहे.’‘आमची ही तिसरी पिढी दोन्ही दैवतांचे पुजारी म्हणून काम पाहत आहे. याठिकाणी एप्रिल-मे महिन्यात राजेवलीबाबांचा आठ दिवस ऊरूस भरतो. पुणे, मुंबई याठिकाणाहून भाविक येतात. सर्व जातिधर्मातील लोक यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. लोकवर्गणीतून हा सण उत्साहात पार पाडला जातो. त्याचप्रमाणे या देवळासमोरच होळीचा सण साजरा केला जातो. यामध्ये तरुणांचा सहभाग मोठा असतो. हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचं हे प्रतीक बनलं आहे,’ असेही वायदंडे यांनी सांगितले.कसल्याही प्रकारचे हेवेदावे आड न आणता एकत्रितपणे दोन्ही समाजातील प्रत्येक सण, उत्सव येथे आनंदाने साजरे केले जातात. पुजारी वायदंडे सांगत होते, वीस वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोध्दार केला. मंदिराच्या दरवाजाच्या एका बाजूला ‘ओम’ आणि दुसऱ्याबाजूला ‘अर्ध चंद्रात चांदणी’ ही दोन्ही दैवतांची प्रतीकं आहेत. येथे येणारा प्रत्येक जण दोन्ही दैवतांसमोर मनोभावे माथा टेकतो. एकाच ठिकाणी हिंदू-मुस्लिमांची दैवतं असणारं हे ठिकाण समतेचे दर्शन धडवित आहे.नवतरुण मंडळाचे राजीव वायदंडे, शशिकांत चांदणे, आदेश इंगळे, शुक्र भिसे, लखन लोंढे, ओंकार तपासे, तसेच नासिर शेख, कादरभाई शेख असे दोन्ही धर्माचे समाजबांधव प्रत्येक सण, उत्सव मिळून मिसळून याठिकाणी साजरे करतात. प्रत्येक वर्षी यात्रेला वर्गणी गोळा करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.