महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे. सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान याच्या बंगल्यावर हजर झालेत.परदेशी पेंटिंग्ज पोर्ट्रेट सील करून ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यांची किंमत कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येतेय. ते कुठून आले? कसे आणले याची शहानिशा सीबीआयचे अधिकारी करत आहेत. अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत गुप्तता पाळली आहे. मात्र अचानक सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज, पुन्हा वाधवान बंधुच्या बंगल्यावर छापा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली.महाबळेश्वर येथे ५ एकर परिसरात वाधवान याचा बंगला आहे. कोरोना काळातील पहिल्या लॉकडाऊनमध्ये वाधवान बंधुनी तत्कालीन प्रधान सचिन राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. तेव्हापासून वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात आहेत.
सातारा : महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 4:56 PM