सातारा : आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने पुण्यातील एक महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला हैदरअली शेख (वय ४६, रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्या साताºयातील फ्लॅटमध्ये पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी झाडाझडती घेतली. या भोंदूबाबाच्या कार्यालय आणि घरावर सीसीटीव्हीचा खडा पहारा पाहून पोलिसही आवाक झाले.सातारा स्थित असलेल्या या भोंदूबाबाने पुण्यामध्ये भानगडी केल्यानंतर त्याचे एक-एक किस्से आता समोर येऊ लागले आहेत. अमावस्या, पोर्णिमेला म्हणे या भोंदूबाबाचा दरबार भरत होता. लाल बहादूर शास्त्री कॉलेजच्या पाठीमागील एका इमारतीमध्ये या बाबाचे दोन फ्लॅट आहेत. दुसºया मजल्यावरील फ्लॅटमध्ये तो दरबार भरवित असत. तर तळ मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये तो कुटुंबासह राहत आहे. संपूर्ण इमारतीमध्ये कोणाच्याही फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही नाहीत. मात्र, या भोंदूबाबाच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर दोन सीसीटीव्ही लावलेले आहेत. येणा-जाणाºया प्रत्येकावर भोंदूबाबाचा वॉच असायचा. भूत उतरवून देतो, आजार बरा करतो, असे सांगून तो दरबार भरवत होता. साताºयामधील लोकही आता त्याचे किस्से सांगू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी या भोंदूबाबावर वाई पोलिस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल झाला असल्याचे समोर येत आहे. तसेच २००६ ला सातारा पालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्येही तो निवडणुकीला उभा राहिला होता. त्यावेळी त्याचे डिपॉझिटही जप्त झाले होते. काही वर्षांपूर्वी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी असं वागू नको, अशी समजूतही घातली होती. मात्र, त्याच्या उचापतीमध्ये काहीच फरक पडला नसल्याचे अनेकजण सांगतायत.अन् त्याला रडू कोसळलंया भोंदूबाबाला पुणे पोलिसांनी तपासासाठी बुधवारी साताºयात आणलं होतं. त्याच्या घराची आणि कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी त्याला रडू कोसळलं. कदाचित आपण केलेल्या कृत्याचे त्याला पश्चात्ताप झाला असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. सुमारे चार तासांनंतर त्याला परत पुण्याला नेण्यात आले.दान केलेल्या गाड्या पार्किंगमध्येपीडित महिलेच्या पतीने दिलेल्या अलिशान गाड्या अद्याप पोलिसांनी भोंदूबाबाकडून जप्त केल्या नाहीत. या सर्व गाड्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहेत. पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर साताºयातील त्याच्या हस्तकांच्या हालचाली वाढल्या. दरबार भरत असलेल्या खोलीतील इतर साहित्य रातोरात एका रिक्षाने अन्य ठिकाणी हलविण्यात आल्याची कुणकुण लागताच त्याचा पोलिस शोध घेत आहेत.पोलिसांकडून आवाहनसंबंधित भोंदूबाबाने पुण्यात जादूटोणाचे प्रकार करून एका कुटुंबाला फसविल्याचे समोर आल्यानंतर साताºयामध्ये त्याने असे प्रकार केले असावेत काय, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. भोंदूबाबाकडून गैरकृत्य झाले असेल तर संबंधितांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भोंदूबाबाच्या घरी सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:09 PM