लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने सातारा पोलीस दलातर्फे शुक्रवारी पोलीस उन्नत दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस बॅण्ड पथकातर्फे राजवाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळासह चौकाचौकात राष्ट्रभक्तीपर गीतगायन करण्यात आले. यावेळी नागरिक उपस्थित होते.
१.
सातारा पोलीस दलातील वाहतूक शाखा कार्यालय परिसरात कोरोना जनजागृतीचा फलक लावण्यात आला आहे. याचे अनावरण गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
२. पोलिस उन्नत दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास पोलीस अधिकारी उपस्थित राहणार असल्याने सातारा वाहतूक शाखेतीलच एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सुस्वागत करणारी रांगोळी काढून ती रंगवली होती. ती रांगोळी खास आकर्षण ठरत होती.
३.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना केंद्राचे इंटेलिजेन्स मेडल जाहीर झाली. याबद्दल त्यांचा गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.