कराड : येथील विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फाउंडेशन यांच्या वतीने आज, बुधवारी कारगिल शौर्यदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विजय दिवस चौकात असणाऱ्या स्तंभाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.२६ जुलै १९९९ ला कारगिल युद्धामध्ये भारताने विजय संपादन केला. त्यापासून हा दिवस 'कारगिल शौर्य दिन' म्हणून कराड येथे साजरा केला जातो. बुधवारीही विजय दिवस चौकात तो साजरा करण्यात आला. सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थी पथकाने सुरुवातीला येथे मानवंदना दिली. त्यानंतर माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलास जाधव, प्रा. बी. एस. खोत, सलीम मुजावर, रत्नाकर शानबाग, कॅप्टन बी जी जाधव यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.यावेळी प्राचार्य गणपतराव कणसे, चंद्रकांत जाधव , सागर बर्गे,चंद्रशेखर दोडमणी,प्रमोद हिंगमिरे,राजू अपीने, भैया अरबुणे, सतीश बेडके, दिनकर थोरात, युवराज मस्के,साधना राजमाने,रोहिणी चव्हाण यांच्यासह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.घोषणांनी परिसर दणाणलाविजय दिवस चौकात स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिल्यानंतर 'भारत माता की जय' 'जय जवान जय किसान',' वंदे मातरम ','शहीद जवान अमर रहे' आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कराडात कारगिल शौर्य दिन साजरा, विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन
By प्रमोद सुकरे | Published: July 26, 2023 12:21 PM