कऱ्हाड : येरवळे (ता. कऱ्हाड) येथील युवकांनी ग्रामस्वच्छता मोहीम राबविली. गावातील सार्वजनिक रस्ते, स्मशानभूमी परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. युवकांच्या या सामाजिक बांधिलकीने प्रेरित होऊन ग्रामस्थांनीही त्यामध्ये सहभाग घेतला.
अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे येरवळे येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली होती. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण स्मशानभूमीत तब्बल दोन फूट गाळ साचला होता. त्यामुळे अंत्यविधीसाठी समस्या निर्माण होत होती. याची जाण ठेवून युवकांनी सोशल मीडियावर एकमेकांशी संपर्क साधून श्रमदान करत संपूर्ण स्मशानभूमी गाळमुक्त करण्याचा निर्णय घेतला. येथील श्रमदानासाठी युवकांनी आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील युवक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते.
विनय लोकरे, अमृत यादव, नितीन यादव, अक्षय शेवाळे, महेश यादव, दिलीप यादव, राजेंद्र वाघमारे, शंकर कुंभार, रोहित पाटील, संदीप लोकरे, किरण पोळ, राहुल पाटील यांच्यासह गावातील युवक व ग्रामस्थांनी या श्रमदानात सहभागी होत स्मशानभूमीची स्वच्छता केली. तेथे साचलेला गाळ हटविण्यात आला. त्यामुळे स्मशानभूमीचा परिसर चकाचक झाला तसेच गावातील सार्वजनिक रस्त्यांचीही यावेळी स्वच्छता करण्यात आली. गावातील युवक एकत्र आल्याने हा स्वच्छता उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
फोटो : १८ केआरडी ०३
कॅप्शन : येरवळे (ता. कऱ्हाड) येथील स्मशानभूमीत साचलेला गाळ युवकांनी श्रमदानाने हटवला.