शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

जिल्हा कारागृहातही आता सेन्सॉर बोर्ड !

By admin | Published: October 14, 2016 12:32 AM

प्रसारमाध्यमांवर वॉच : कैद्यांना उत्तेजित करणाऱ्या बातम्यांना लावली जाते कात्री

दत्ता यादव ल्ल सातारा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जसे सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहून तो प्रदर्शित करायचा की नाही, याचा निर्णय घेते. त्याच पद्धतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना समाजातील घटना विशेषत: जेलमधून पळून जाण्यासंदर्भातल्या काही घटना असतील तर त्यांना समजू नये, यासाठी कारागृहामध्ये सेन्सॉर बोर्डसारखी समिती कार्यरत झाली असून, या समितीच्या माध्यमातून कारागृहात येणाऱ्या वर्तमानपत्रांवर वॉच ठेवण्यात येत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये सध्या तीन हजारांहून अधिक बंदिवान आहेत. ज्यांचे न्यायालयात खटले सुरू आहेत. अशा लोकांनाच या कारागृहामध्ये ठेवले जाते. मात्र ज्यांना शिक्षा लागते, अशा कैद्यांना कोल्हापूर येथील कळंबा किंवा पुणे येथील येरवडा कारागृहामध्ये ठेवण्यात येते. रोज सकाळी कारागृहामध्ये विविध वर्तमानपत्रे आणि मासिके, पुस्तके येत असतात. या माध्यमातून बंदिवानांना बाहेर समाजामध्ये सुरू असलेल्या घडामोडी समजत असतात. अनेकदा वर्तमानपत्रामध्ये देशातील कारागृहात घडलेल्या घटनांची विस्तृत बातमी दिली जाते. अमूक कैदी कसा पळून गेला, जेल प्रशासनावर कसे हल्ले झाले, जेलमध्ये कोण उपोषणाला बसले, अशा संदर्भातल्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून येत असतात. या बातम्या जर बंदिवानांनी वाचल्या तर त्यांच्या मानसिकतेत बदल होऊन हे बंदिवानही त्यांची ‘कॉफी’ करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशी धास्ती सातारा जिल्हा कारागृहातील प्रशासनाला असल्यामुळे प्रशासनाने सेन्सॉर बोर्डसारखी हुबेहुब समिती नेमली आहे. ही समिती कारागृहात सकाळी येणारी सर्व वर्तमानपत्रे ताब्यात घेते. एका टेबलवर बसून ही समिती जेलच्या अनुषंगाने कुठे बातमी आहे का, हे काटेकोरपणे तपासते. त्यानंतर अधीक्षकांकडे ही वर्तमानपत्रे दिली जातात. एखाद्या जेलमधून कैदी पळून गेला असेल आणि ते वृत्त ज्या वर्तमानपत्रामध्ये छापून आले असेल, अशा वर्तमानपत्रातील ती बातमी कापून ठेवली जाते. त्यानंतरच ते वर्तमानपत्र सर्व बंदिवानांना वाचण्यास दिले जाते, इतकी खबरदारी कारागृृहात प्रशासनाकडून घेतली जात आहे. अशा प्रकारची उपयायोजना करणारे सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह हे महाराष्ट्रातील एकमेव कारागृह आहे. ही एक वेगळी दक्षता यानिमित्ताने पाहायला मिळते. चाळीस सीसीटीव्हींचा वॉच ! कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त बंदिवान आहेत. त्या मानाने कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय तुटपुंजी आहे. मात्र, तरीही उपलब्ध मनुष्यबळामध्ये जेलप्रशासन काम करत आहे. परंतु आधुनिकतेला जोड देत कारागृह प्रशासनानेही बदलाची कात टाकली असून, तब्बल चाळीस सीसीटीव्ही कारागृहात बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे जेलप्रशासनाचे काम प्रचंड हलके होणार आहे.