कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ हेअर, स्किन आणि मेकअप विभागाच्यावतीने प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. रोहित झेंडे, प्राचार्य मोहन राजमाने, विवेक भोज, शिवाजी सूर्यवंशी उपस्थित होते. विभागाचे समन्वयक डॉ. कोमल कुंदप यांनी प्रास्ताविक केले. महेश माने यांनी मनोगत व्यक्त केले. निरंजन सूर्यवंशी यांनी आभार मानले.
कऱ्हाडात पाणपोई
कऱ्हाड : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून उकाड्यानेही सर्वांना हैराण केले आहे. या परिस्थितीत तहानलेल्यांची तहान भागविण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे. सामाजिक संस्था तसेच व्यक्तींकडून सुरू करण्यात आलेल्या या पाणपोईंमुळे उन्हाच्या तडाख्यात नागरिकांना थंड पाणी उपलब्ध होत आहे.
दुभाजकाची रंगरंगोटी
कऱ्हाड : गुहाघर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कऱ्हाड ते पाटणदरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर कऱ्हाडपासून विजयनगरपर्यंत दुभाजक असून सध्या त्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याचा कायापालट झाला असून रंगरंगोटी केलेले दुभाजक आणि त्यामध्ये उभारण्यात आलेल्या संरक्षक रेलिंगमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
गरजूंना अन्नदान
कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे सध्या फिरस्त्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. महामार्गाच्या उड्डाण पुलासह ठिकठिकाणी आसरा घेऊन हे फिरस्ते बसलेले असतात. सध्या कऱ्हाडसह परिसरात अशा फिरस्त्यांना अन्नदान करण्याचा उपक्रम सामाजिक संस्थांच्यावतीने राबविण्यात येत आहे. गरजूंना त्यांच्याकडून जेवणाची पाकिटे पोहोचविली जात आहेत.