दरम्यान, माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी संपूर्ण गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आरोग्य विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. ग्रामस्थांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
चाफळ येथे चार दिवसापूर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला गळती लागली होती. त्यामुळे दोन दिवस गावात पाणीपुरवठा बंद होता. गळती काढल्यानंतर गावाला पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यायला हवी होती; परंतु ती न घेतल्याने संपूर्ण गावाला दूषित पाण्याचा पुरवठा झाला. परिणामी, गावात मोठ्या प्रमाणात अतिसाराची साथ पसरली. दूषित पाण्यामुळे गावातील शंभराहून अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आले. चाफळला रुग्णसंख्या वाढू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुरुवातीला शुभम चंद्रकांत कुंभार, शौर्य रवींद्र कुंभार, निशिगंधा दीपक कुंभार, श्रावणी भीमराव कुंभार, जगूबाई नाना साळुंखे, अनिल राजेंद्र कुंभार, अनुष्का सुरेश कुंभार, राज पाटील, वैभव पाटील, तृप्ती करकरे, पोलीस पाटील सागर चव्हाण, प्रकाश गणपती चव्हाण, वसंत बाळू चव्हाण, विनायक बबन कुंभार, आदिती पाटील, आरती कांबळे, विकास हिंदोळे, सुनीता दत्तात्रय पाटील, दीप्ती शिंदे, रुद्र जंगम, कमल काटे, काशीनाथ साळुंखे, गंगाराम वाघमारे, प्रिया कुंभार, हणमंत शिंदे, वसंत चव्हाण, इशा शेख, श्रावणी चव्हाण, मोनाली बहुलेकर, अनुष्का वेदपाठक अशा सुमारे तीस जणांना अतिसाराची लागण झाली होती. त्यानंतर हा आकडा वाढून शंभरी पार गेला आहे. यापैकी बहुतांश बाधितांवर चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर काहींवर कऱ्हाडच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
- चौकट
आरोग्य विभागाने कंबर कसली
शिक्षण सभापती राजेश पवार यांनी संपूर्ण गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा करत चाफळकरांना दिलासा दिला आहे. आरोग्य विभागानेही कंबर कसली आहे. ग्रामपंचायतीने गळती काढली असली तरी साथ आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. सुरुवातीला गावात साथ पसरली असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
फोटो : २१केआरडी०५
कॅप्शन : चाफळ, ता. पाटण येथे गॅस्ट्रोची साथ पसरल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.