सातारा , दि. १६ : विभागीय बास्केटबॉल स्पर्धेचा उपांत्य सामना साताऱ्यातील शानभाग विरुद्ध वारणानगर यांच्यात होता. सामना निम्मा झालेला असतानाच आघाडीची खेळाडू चैतन्या राजेच्या घोट्याला दुखापत झाल्याने जखमी झाली. दोनच तासांनी झालेल्या अंतिम सामन्यात चैतन्याने तीस गुण नोंदविले. यामुळे शानभाग संघ विभागीय स्पर्धेत विजेता ठरला.
सांगली येथे विभागीय बास्केटबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत साताऱ्यातील के. एस. डी. शानभाग विद्यालयातील संघ सहभागी झाला होता. सतरा वर्षांखालील मुलींच्या संघाने विजय मिळविला. या संघाने उपात्य सामन्यात वारणानगर संघाला वीस गुणांनी पराभूत केले. तर अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाचा तीस गुणांनी पराभव करून विजय संपादन केला.
कर्णधार तनिका संकेत शानभाग हिच्या नेतृत्त्वाखालील संघात अंजली चव्हाण, चैतन्य राजे, आर्या मोरे, माधवी इंगळे, सिद्धी शिंदे, शिवानी बैलकर, अनुरिमा देशमुख, वैष्णवी गोगावले, अविशा गुरव, मानसी घाडगे, साक्षी खेतमर यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.
क्रीडाशिक्षक व राष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक अभिजित मगर यांनी मार्गदर्शन केले. अतुल शिंदे, शुभम बनसोडे यांनी सहकार्य केले. यशाबद्दल शाळेचे संस्थापक रमेश शानभाग, संचालिका आँचल घोरपडे, मुख्याध्यापिका माध्यमिक रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांनी कौतुक केले.सांगली येथे झालेल्या विभागीय बास्केटबॉल स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंसमवेत रमेश शानभाग, आँचल घोरपडे, रेखा गायकवाड, भाग्येश कुलकर्णी, अभिजित मगर.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं