रेठरे बुद्रुक : कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू क्रीडा मंडळ सडोली या संघाने विजेतेपद पटकाविले. जयवंतराव भोसले प्रतिष्ठान पुरस्कृत शिवनगरचा क्रांतिसिंंह संघ उपविजेता ठरला.कऱ्हाड तालुका साखर कामगार संघ व शिवोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा कारखाना कार्यस्थळावर स्पर्धेचे आयोजन केले होते. कारखान्याचे उपाध्यक्ष लिंंबाजीराव पाटील व संचालक संजय पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. क्रीडास्थळास कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले, विनायक भोसले, संचालक जगदीश जगताप, गिरीश पाटील, अमोल गुरव, निवासराव थोरात, सुजित मोरे, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, संग्राम पाटील, पै. आनंदराव मोहिते, संजय पवार, राहुल पाटील आदींनी भेट दिली. कार्यकारी संचालक जगदीश हरळीकर, कऱ्हाड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, सचिव उदय मोरे, गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष, महिपतीराव पाटील, सुरेश साळुंखे, सर्जेराव पाटील, व्ही. के. मोहिते, राजेंद्र मोहिते, मारुती माने, श्रीराम राजहंस, राज्य पुरस्कार विजेते राजेंद्र मोहिते, एस. आर. कार्वेकर आदी उपस्थीत होते. अष्टपैलू खेळाडू म्हणून सडोली संघाच्या प्रफुल्ल पाटील यास गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या संघास २० हजार व चषक, द्वितीय क्रमांकाच्या संघास १५ हजार व चषक बक्षीस देण्यात आले. दिवंगत जयवंतराव भोसले प्रतिष्ठान पुरस्कृत क्रांतिसिंह संघाने उपविजेतेपद पटकावले. चतुर्थ क्रमांक शिवाजी उदय मंडळ सातारा संघाने पटकाविला. उत्कृष्ठ चढाईचा मानकरी क्रांतिसिंह संघाचा महेश पवार ठरला. उत्कृष्ठ पकड शिवाजी संघाचा शहानवाज शेख ठरला. स्पर्धेचे पंच म्हणून संजय पाटील, सुरेश चिखले, भालचंद्र जाधव, रमेश देशमुख, राजेंद्र चव्हाण, तानाजी देसाई यांनी काम पाहिले. यावेळी प्रदीप बंडगर, मनोज पवार, महेश पवार, सुहास वगरे उपस्थित होते. (वार्ताहर)
कोल्हापूरचा शाहू सडोली संघ विजेता
By admin | Published: December 27, 2015 11:37 PM