मायणी : सूर्याचीवाडी येथे रात्रीच्या वेळी विनापरवाना शिकार करीत असणाऱ्या दोघांना वन विभागाने अटक केली. त्यांच्याकडून ससा तसेच शिकारीसाठी लागणारे साहित्य आणि एक दुचाकी ताब्यात घेतली असल्याची माहिती मायणीचे वनपाल एम. जी. पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, केशव हणमंत सुर्वे (रा. पिंपरी ता. खटाव) व अभिजित परशुराम वळकुंडे (रा. सूर्याचीवाडी, ता. खटाव) हे कुत्र्याच्या मदतीने सूर्याचीवाडी परिसरामध्ये शिकार करत होते. त्यावेळी वनविभागातील कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी वरील दोघांकडून एक मृत अवस्थेतील ससा, शिकारीसाठी लागणारे साहित्य व त्यांच्याकडील दुचाकी (एम. एच. ११ सीटी ६८३५) ताब्यात घेतली. त्यांच्यावर वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शितल फुंदे, वनपाल एम. जी. पाटील, रामदास घावटे, वनरक्षक संजीवनी खाडे यांनी संयुक्त केली आहे.