शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

'जय श्रीरामा'च्या जयघोषात चाफळमध्ये रथोत्सव संपन्न, रामभक्तांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 2:17 PM

नवमी, दशमी व एकादशी हे तीन मुख्य दिवस या उत्सवाचे मानले जातात. चैत्र शुध्द एकादशीला रथोत्सव साजरा करुन या उत्सवाची सांगता करण्यात येते.

हणमंत यादवचाफळ : 'प्रभू रामचंद्र की जय , सत सत सिता राम की जय, बोल बजरंग बली की जय'च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या सासन काठ्यांच्या साक्षीने चाफळला श्रीराम नवमी उत्सवातील श्रीरामाचा रथोत्सव आज, मंगळवारी सूर्योदयाबरोबर अभूतपूर्व वातावरणात संपन्न झाला.समर्थ रामदास स्वामींनी सन १६४८ पासून सुरु केलेला श्रीरामनवमीचा उत्सव साडेतीनशेहून अधिक काळापासुन आजही अखंडितपणे तिर्थक्षेत्र चाफळ येथे सुरु आहे. यावर्षीचा हा ३७५ वा रामनवमी उत्सव आहे. चैत्र शुध्द प्रतिपदा गुढी पाडव्यापासुन ते एकादशी पर्यंत हा उत्सव तब्बल दहा दिवस अभूतपूर्व वातावरणात साजरा केला जातो. नवमी, दशमी व एकादशी हे तीन मुख्य दिवस या उत्सवाचे मानले जातात. चैत्र शुध्द एकादशीला रथोत्सव साजरा करुन या उत्सवाची सांगता करण्यात येते.आज, मंगळवारी पहाटे काकड आरती होऊन समर्थ वंशज गादिचे मानकरी दुर्गाप्रसाद आयोध्यानाथ स्वामींच्या हस्ते श्रीरामाची महापुजा करण्यात आली. यानंतर चांदीच्या पालखीतुन श्रीरामाची पट्टाभिषिक मूर्ती वाजत- गाजत शेकडो मशालींच्या साक्षीने मंदिरास प्रदक्षिणा घालून रथाकडे आणण्यात आली. यावेळी समर्थ वंशज गादिचे मानकरी दुर्गाप्रसाद आयोध्यानाथ स्वामींच्या हस्ते रथाच्या चारी चाकावर नारळ फोडण्यात आले. दरम्यान बारा बलूतेदार व रथाचे मानकरी साळुंखे बंधूंना मानपानाचे नारळ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ' सत सत सिताराम की जय ' चा जयघोष करत भाविकांनी रथ ओढण्यास सुरुवात केली.रथासमोर चांदीची पालखी, सुवासिक फुलांनी सजवलेली अबदागिरी, मानाच्या सासन काठ्या, सजवलेले घोडे, शेकडो मशाली, समर्थ वंशज तसेच उत्सवाचे मानकरी आणी हजारो रामभक्त प्रभू रामाचा जयघोष करत रथ ओढत होते. मंदिरापासुन निघालेला रथ सकाळी सुर्योदयावेळी बसथानकाजवळिल कालेश्वर मारुती मंदिराजवळ पोहचल्यानंतर मंदिरास प्रदक्षणा घालून विधी उरकुन परत पुन्हा रथ मंदिराच्या पायथ्यापर्यंत आणण्यात आला. रथोत्सवासाठी सकाळपासुनच मंदिर परिसरात रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.डोळेगांव, निनाम पाडळी, अंगापूर येथील मानाच्या सासनकाठ्या या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. त्यांचाही मानपान देवून सत्कार करण्यात आला. श्रीरामाची पालखी सनई वाद्याच्या गजरात मंदिराच्या मुख्य दरवाजवळ आल्यानंतर दहिभात व नारळाचा नैवेद्य देण्यात आला. यावेळी उपस्थित महिला सुवासिनींनी पंचारती ओवाळून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर