लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी तालुक्यातील २४ कोतवालांना निलंबित केले. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तसेच तलाठी कार्यालयातील कामकाजावरही परिणाम झाला आहे.
दरम्यान, पाटण तालुका कोतवाल संघटनेने जिल्हाधिकारी श्वेता सिंंघल यांच्याकडे धाव घेऊन २४ कोतवालांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची अधीसूचना जाहीर होण्यापूर्वी २९ आॅगस्ट २०१७ ते २ सप्टेंबर २०१७ पर्यंत पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी ईव्हीएम मशीन एफएलसी कामी एकूण २४ कोतवालांच्या नेमणुका केल्या होत्या. मात्र, कोतवाल कर्मचारी वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनांचे पालन करत नाहीत. कामात हलगर्जीपणा करीत आहेत. या कारणास्तव तालुक्यातील २४ कोतवालांना तडकाफडकी निलंबित करण्याचा निर्णय तहसीलदारांनी ३१ आॅगस्ट रोजी घेतला. त्यामुळे २५ महसुली सजातील काम थांबले आहे. सध्या तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यातच कोतवालांना निलंबित केल्यानेमहसूल विभागावर कामाचा ताण पडणार आहे.पाटण तालुका कोतवाल संघटनेने जिल्हाधिकारी श्वेता सिंंघल यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, जिल्ह्यात ४५० कोतवाल काम करत असून, त्यांना दरमहा ५ हजार १० रुपयांचे अल्पवेतन दिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे कामकाज आदेशानुसार तहसीलस्तरावरील अधिकाºयांच्या लेखी, तोंडी आदेशाने कोतवाल कर्मचाºयांच्या नेमणुका केल्या जातात. त्याप्रमाणे कोतवाल सेवा बजावत असतात. मात्र, या कामाचा मोबदला प्राप्त झाल्यावर भत्ता दिला जाईल, असे तोंडी सांगितले जाते. प्रत्यक्षात भत्ताच दिला जात नाही. भत्त्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.दरम्यान, या निवेदनावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीचे उपसरचिटणीस योगेश बाबर, सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, सातारा जिल्हा संघटक प्रकाश काशीद, सातारा जिल्हा संघटक जयवंत गायकवाड व संजय साळुंखे, पाटण तालुकाध्यक्ष मोहन कवर, उपाध्यक्ष निवास सुतार यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकाºयांच्या सह्या आहेत.निलंबन मागे घेण्याची मागणी...निवडणुकांचे कामकाज करण्यासाठी कोतवाल कर्मचाºयांची नेमणूक केली जाते. तहसील कार्यालयात वर्ग ४ च्या कर्मचाºयांची फोन ड्यूटीचे कामकाज रात्रपाळीसाठी व महिला कर्मचाºयांची दिवसपाळीसाठी नेमणूक केली जाते. वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांची कामे कोतवालांकडून करून घेतली जातात. झिरो पेंडन्सीचे कामकाजही कोतवालांकडेच दिले जाते. ही सर्व कामे केल्यानंतर अतिरिक्त कामकाजासाठी मोबदला दिला जात नाही, अशा तक्रारी निवेदनात कोतवाल संघटनांनी करून पाटण तालुक्यातील २४ कोतवालांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे.