सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेकांना मोबाईलवरून ‘लॉटरी लागली आहे. एवढी रक्कम भरल्यास पूर्ण रक्कम मिळेल’ असा मेसेज पाठविला जात आहे. त्यातून ऑनलाईन फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे. या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात आहे.
०००००
बाजारात गर्दी
सातारा : साताऱ्यातील जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, अनेक जण कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. अनेक जण गर्दीमध्येही विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
००००००००००
ऊस वाहतुकीमुळे बैलांचे हाल
सातारा : जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस वाहतूक केली जाते. मात्र, ट्रॅक्टर रोडवर थांबविला जातो. तो फडापर्यंत जात नाही. फडापासून ट्रॅक्टरपर्यंत बैलगाडीतून ऊस आणला जातो. त्या ठिकाणी कित्येक तास बैलांना वजन खांद्यावर घेऊन उभे राहावे लागत आहे. ट्रॅक्टरवर मोळी टाकताना अवघड जात असल्याने अनेक जण त्यात उभे राहून काम करतात.
०००००००
धार्मिक कार्यक्रम रद्द
सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी महाशिवरात्र उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यंदा कोरोनाचा शिरकाव झालेला असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा, जत्रा रद्द केल्या असून धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे हे कार्यक्रम रद्द केले आहेत.
०००००००००
झाडे लागली कोमेजू
सातारा : जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांच्या समोर असलेल्या मैदानात कोरोनापूर्वी शोभेची झाडे, फुलझाडे लावली होती. त्यांची सेवकाकडून निगा राखली जात होती. मुलं, शिक्षक पाणी घालत असत. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ते बंद आहे. त्यामुळे झाडेही कोमेजू लागली आहेत.
००००
एटीएममधून खराब नोटा
सातारा : साताऱ्यातील अनेक व्यापारी पाच रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीत. आठवडा बाजारात तर पाचच्या नोटा बंद झाल्या असल्याचे व्यापारी बिनधास्त सांगत असतात. तसेच सध्या दहा रुपयांच्या नोटा बाजारात वाढल्या आहेत. त्याही खराब झालेल्या असल्याने नोटा स्वीकारण्यावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत योग्य तो खुलासा करण्याची मागणी केली जात आहे.
०००००००
टपालपेट्या गायब
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळला ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ बाजारासाठी येत असतात. त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी टपालपेटीची सोय करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात पत्रांचा वापर कमी झाला अन् शहरातील टपालपेट्याही गायब झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
००००००००
हॉटेलात दुर्लक्ष
सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली. पण त्यामुळे संसर्ग थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक हॉटेलमध्ये एका टेबलावर प्रमाणापेक्षा जास्त ग्राहक बसलेले असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे.
००००००००
महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान
सातारा : जागतिक महिला दिनानिमित्ताने महेश कांबळे मित्रसमूहाच्या माध्यमातून सातारा शहर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांच्यासह सहकारी महिला पोलिसांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेश कांबळे, सागर शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सातारा शहराध्यक्ष अश्विन मस्के, संगीता काळे उपस्थित होत्या.
००००००
चौकात रात्रीही गर्दी
सातारा : जिल्ह्यात काही महिन्यांनंतर पुन्हा काेरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रात्री अकरानंतर संचारबंदी लागू केली आहे. तरीही राजवाडा, मोती चौकात रात्री अकरा वाजताही असंख्य सातारकर आईस्क्रिम खाणे, दूध पिण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे.
०००००००००
युवकांचा रात्री गोंधळ
सातारा : साताऱ्याच्या पश्चिमेला महादरे तलावाच्या पाठीमागे असलेल्या फार्म हाऊसमध्ये गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत जोरजोरात गाणी म्हणून गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.