शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

Satara- पुसेसावळी चांगली, मग कशासाठी दंगली?; एकीतूनच साधला गावाने विकास

By संजय पाटील | Published: September 13, 2023 1:34 PM

पारायणाच्या पंगतीला मुस्लिम समाजाचे जेवण; आक्षेपार्ह पोस्ट, दंगलीमुळे गालबोट 

संजय पाटीलपुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी ही विभागातील गावांची महत्वाची बाजारपेठ. 'सर्वधर्म समभाव' ही या गावाची आजवरची ओळख; पण गावच्या याच लौकिकाला गालबोट लागण्याचा प्रकार घडला. जिथं पारायणात पहिली पंगत मुस्लिम समाजाकडून घातली जाते त्याच पुसेसावळीत दंगल उसळली. हे का घडलं, यापेक्षा हे घडलच कस, याची सल ग्रामस्थांच्या मनात आहे.पुसेसावळीला १९२२ मध्ये ग्रामपंचायत स्थापन झाली. त्याकाळी गावाचा आवाका जेमतेम होता. मात्र, कालांतराने गावचे रूपडे पालटले. विभागातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून गाव नावारूपाला आले. ग्रामपंचायतीनेही गावात सोयीसुविधा पुरवल्या. त्यामुळे बाजारपेठेच्या विस्ताराला चालना मिळाली. टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायत सक्षम होत गेली आणि त्याचबरोबर गावाच्या विकासाचा आलेखही चढता राहिला.

२००९ मध्ये याच एकीतून ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पहिला क्रमांक मिळवला. तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. एका बाजूला गाव विकासाच्या उंबरठ्यावर असताना दुसऱ्या बाजूला गावात सलोखा राखण्याचे कामही ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने केले. एकोपा हीच गावाची खरी ओळख बनलेली. मात्र या लौकिकाला काही समाजकंटकांमुळे गालबोट लागले.

जनजीवन पूर्वपदावर येईल पण....

सोशल मीडियावर व्हायरल झालेली आक्षेपार्ह पोस्ट आणि त्यानंतर गावात उसळलेली दंगल या दोन्ही गोष्टी गावाच्या विकासाला मारक ठरल्या आहेत. त्याबरोबरच सामाजिक सलोख्यालाही या घटनांमुळे धक्का पोहोचला आहे. काही दिवसात येथील जनजीवन पूर्वपदावर येईल; पण या घटनेमुळे समाजमनाला झालेल्या जखमा भरून येण्यास आणखी बराच कालावधी जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला आणि ग्रामस्थांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे.

पारायणाच्या पंगतीला मुस्लिम समाजाचे जेवणपुसेसावळीत दर तीन वर्षांनी अधिकमासात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला जातो. कित्येक वर्षाची गावाची ही परंपरा असून ही परंपरा ग्रामस्थांकडून जपली जाते. या सोहळ्यात दीड ते दोन हजार भाविक सहभागी होतात. सलग आठ दिवस त्यांच्याकडून पारायण होते. या सोहळ्यात भाविकांच्या जेवणाची पहिली पंगत मुस्लिम समाजाकडून घातली जाते. हे या गावाचे वैशिष्ट्य. यंदा अधिक मासात काही दिवसांपूर्वीच हा सोहळा पार पडला आणि त्यानंतर ही अनपेक्षित घटना घडली आहे.

हजारभर उंबऱ्यांचं गावविभागातील इतर गावांपेक्षा पुसेसावळीची लोकसंख्या तुलनेने जास्त आहे. याठिकाणी व्यापारी पेठ असल्यामुळे अनेकजण याचठिकाणी वास्तव्यास आहेत. गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार असून हजारभर कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्याबरोबरच व्यवसाय व कामानिमित्तही अनेकजण येथे वास्तव्यास आहेत.

पुसेसावळीत घडलेली घटना वेदनादायी आहे. गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थ प्रयत्नशील असताना गावाच्या लौकिकाला अशा पद्धतीने गालबोट लागेल, असे वाटले नव्हते. मात्र, यापुढे गावात सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी सर्वांना बरोबरीने घेऊन आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. - सुरेखा माळवे, सरपंच 

गावात यापूर्वी कधीही अनुचित प्रकार घडला नव्हता. यापुढेही असा प्रकार घडू नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहतील. गावातील शांतता आणि ऐक्य अबाधित राहण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. - डॉ. राजू कदम, उपसरपंच 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस