शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

खंबाटकी बोगद्याजवळ रसायनाचा टँकर पलटी

By admin | Published: November 03, 2016 11:28 PM

टँकरचालक जखमी

खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. त्यामुळे त्याला गळती लागली असून, पोलिसांनी सावधानता बाळगत घटनास्थळी दोन अग्निशमन बंब तयार ठेवले होते. या अपघातात टँकरचालक जखमी झाला. याबाबतची माहिती अशी की, महाड येथील औद्योगिक वसाहतीतून ज्वालाग्राही रसायन घेऊन टँकर (एमएच ०४ डीएस ४०५६) हैद्राबादकडे निघाला होता. खंबाटकी बोगदा ओलांडून बेंगरुटवाडीजवळ असलेल्या ‘एस’ वळणावर टँकर आला असता ब्रेक न लागल्याने टँकर लोखंडी ग्रीलला धडकला. त्यानंतर दोन ते तीन पलट्या घेत टँकर सुमारे दोनशे फूट लांब सेवा रस्त्यावर जाऊन पलटी झाला. या अपघातात टँकरचालक जखमी झाला. त्याला लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर टँकरमधील ज्वालाग्राही रसायन सेवा रस्त्यावरून वाहू लागले. पेट्रोलपेक्षा अधिक ज्वालाग्राही रसायन असल्याने पोलिसांनी तातडीने भुर्इंज व पाचगणी येथील अग्निशमन बंब बोलाविले. रसायनाचा हवेशी संपर्क आल्यानंतर त्याची वाफ होत होती. यासंदर्भात अनर्थ टाळण्यासाठी रसायन सुरक्षारक्षकाला बोलविले होते. दरम्यान, दुसरा टँकर बोलावून मोटारच्या साह्याने रसायन त्यात भरले जात आहे. (प्रतिनिधी)