लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रूक : ‘छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, प्रभावी व्यवस्थापन व सेवकांचे परिश्रम याच्या जोरावर कोरोना काळातही गत सालात संस्थेमध्ये ३८ कोटी २९ लाखांची संमिश्र व्यवसायाची वाढ झाली आहे. यावरून कोरोनाचे अडचणीचे काळातही ग्राहकांचा संस्थेवर विश्वास वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे,’ असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयात पिंपोडे बुद्रूक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेची ३१ मार्च २०२१ अखेरची सांपत्तिक स्थितीची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी अशोक रा. लेंभे उपस्थित होते.
३१ मार्च २०२० अखेर संस्थेचा संमिश्र व्यवसाय ७९३ कोटी ४८ लाख होता. त्यामध्ये गतवर्षात कोरोना काळातही ३८ कोटी २९ लाखांनी वाढ होऊन ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेचा संमिश्र व्यवसाय ८३१ कोटी ७७ लाख झाला आहे. ८ विभागीय कार्यालये व ५२ शाखांचे विस्तारातून सीबीएस प्रणाली राबवून पारदर्शक व गतिमान कारभार करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने गेल्या वर्षभरात करता येईल तेवढी खर्चात कपात करून, ठेवींचे व्याजदर कमी करून, झूमद्वारे बैठका घेऊन कारभार केल्याने हे यश मिळाले आहे व नफ्यात वाढ झाली आहे, असे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी सांगितले.
सर्व ठिकाणची परिस्थिती हाताळत अध्यक्ष हणमंतराव पवार, उपाध्यक्ष बाबूराव काकडे, संचालक मंडळ, व्यवस्थापन,सल्लागार यांचे प्रोत्साहनामुळे अधिकारी व सेवकांनी कोरोनायोद्धा बनून सेवा पुरवून ग्राहकांची मने जिंकली व विश्वासाने वसुलीही केली आणि ग्राहकांचे अडचणीचे काळात कर्जवाटपही केले, असेही संस्थापक लेंभे यांनी नमूद केले. (वा.प्र.)
१८रामभाऊ लेंभे (आयकार्ड फोटो घेणे)