शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

छत्रपतींच्या वंशजांनी जनतेच्या उठावाचे नेतृत्व करावे : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:47 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिवरायांचे तत्व आचरणात आणून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे केले आवाहनशिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे

सातारा ,11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.

येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी मार्गदर्शनाची व सहकार्याची गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

डॉ. पाटणकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जनतेला छत्रपती शिवराज, छत्रपती शंभूराजे आणि शंभूपुत्र शाहूमहाराज यांची देदीप्यमान परंपरा लाभली आहे. सरंजामदार, जमीनदारांपासून रयतेला मुक्त करण्याचे कार्य करण्याचा वारसादेखील आहे. शिवरायांनी जातीय शोषणाच्या उतरंडीला आव्हान देऊन अगदी तळातील जातींनाही सन्मानाने जगण्यासाठी परिसर तयार केला.

स्त्रियांना मुक्तपणे आणि निर्भयपणे जगता येणारी सामाजिक परिस्थिती तयार केली. हा वारसा जपण्याची जबाबदारी छत्रपतींचे वंशज आणि सातारकर जनतेचीदेखील आहे. या जबाबदारीला तडा पडेल, अशा घटना इथून पुढे घडू नयेत, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी. आज देशातील कष्टकरी जनता संकटात आहे.

बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शासनाच्या घोषणांमधून दुष्काळ नाहीसा होईल, असे वाटत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. सार्वत्रिकपणे भयाच्या छायेखाली जनतेला ठेवले जात आहे. जातीभेदाचे राजकारण खेळून समाजात भिंती निर्माण केल्या जात आहेत. अशी परिस्थिती बदलून भयमुक्त पर्यावरण संतुलित आणि सर्व कष्टकरी जनतेच्या जीवनात समृद्धी आणणारा विकासाचा आराखडा राबविण्यासाठी, जातीअंतासाठी, स्त्रीमुक्तीसाठी जनचळवळ उभारणे तातडीचे बनले आहे. वास्तविक, अशी चळवळ उभी करणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आहे.

छत्रपतींच्या सर्व वारसांनी यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी डॉ. पाटणकर यांनी केले. पत्रकार परिषदेला डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, संतोष घोटल, यशवंत लावंड, जयसिंग कदम आदींची उपस्थिती होती.या प्रश्नांवर लढा उभारा

  1.  शेतकरी, कामगारांना उद्ध्वस्त करणारी सरकारची धोरणे
  2.  भांडवलदारांसाठी शेतकºयांना भूमिहीन करून घातक प्रकल्पांची उभारणी
  3.  कोट्यवधी रुपये खर्चूनही दुष्काळ कायम
  4. अन्यायाविरुध्द लढणाºयाला संपविण्याचे कारस्थान
  5.  शेतकºयांची कर्जबाजारी
  6.  अन्यायकारक टोलनाके बंद झालेच पाहिजेत

शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत धोरण हाती घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न हाती घ्यावा. हे धोरण राबविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात होणाºया उठावाचे नेतृत्व छत्रपतींच्या वंशजांनी करावे.- डॉ. भारत पाटणकर