सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील जलमंदीर येथे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी जलमंदिर येथील भवानी मातेचे दर्शन घेतले. तसेच उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी आपण जनतेसाठी काम करत असून लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे होणाऱ्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलानासाठी येणार होते. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना साताऱ्यातील जलमंदिर येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी उदयनराजेंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मी कायम जनतेत राहून काम करणारा कार्यकर्ते आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडणे त्यासाठी लढत राहणे हा माझा स्वभाव आहे. त्यानुसार लोकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी असी प्रत्येकाची अपेक्षा असते. माझी देखील तशीच अपेक्षा आहे.उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषद सातारा येथील मैदानावर शिवाजी महाराजांच्या कार्यकालावर आधारित जाणता राजा हे महानाट्य सुरु आहे. त्याबरोबरच विविध स्पर्धा आणि कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उदयनराजेंची भेट, वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
By दीपक शिंदे | Published: February 24, 2024 1:20 PM