सातारा : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी पाटण तालुका दाैऱ्यावर येत आहेत. या दाैऱ्यात विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन, उद्धटन होणार आहे. त्याचबराेबर मरळी येथे सभाही होणार आहे. या सर्व कार्यक्रमात पालकमंत्री शंभूराज देसाई त्यांच्याबरोबर असणार आहेत. यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांचे मुंबईकडे प्रस्थान होणार आहे.मुख्यमंत्री शिंदे यांचे रविवारी दुपारी अडीच वाजता पाटण तालुक्यातील सुरूल येथील हेलिपॅडवर आगमन होईल. त्यानंतर ते काळोलीकडे प्रस्थान करणार आहेत. काळोलीत त्यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशिय कृषी संकुलाचे उद्घटन होणार आहे. या उद्घटनानंतर दुपारी २ वाजून ५५ मिनीटांनी पाटण नगरपंचायतीत नगरोत्थान योजनेखालील मंजूर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होईल.दुपारी ३ वाजून १० मिनीटांनी नाडे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण होईल. त्यानंतर ते मल्हारपेठकडे प्रस्थान करतील. तेथे लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय नूतनीकरण आणि नामकरण समारंभास उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर दुपारी साडे तीन वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे दाैलतनगर मरळी येथे सभास्थळी आगमन होईल. याठिकाणी विविध विकासकामांचा आॅनलाइन भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मरळी येथील हेलिपॅडवरुन मुख्यमंत्री शिंदे हे पुणेमार्गे मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवही पाटणमध्ये..केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हेही पाटण तालुका दाैऱ्यावर रविवारी येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ते हेलिकाॅप्टरने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.