शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना समजावून सांगावे, नाहीतर..; लक्ष्मण मानेंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 4:23 PM

राज ठाकरे यांनी देश, समाजासाठी काय केले ? ते नकलाच करतात. भोंग्यावरुन बोलतात. हे भोंगे आता लागले आहेत का ? ‘कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे हे काम करत आहेत. आजोबांकडून त्यांनी काही तरी शिकायला हवे होते.

सातारा : ‘मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठिशी मूठभर वर्ग सोडला तर कोणी नाही. त्यांच्याकडून दोन धर्मात द्वेष पसरविण्याचेच काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाला समजावून सांगावे. नाहीतर त्यांना अटक करावी. त्याचबरोबर गरज पडल्यास राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करेन,’ असा इशारा ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी दिला आहे.सातारा येथील शासकीय विश्रामृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने म्हणाले, ‘२१ एप्रिलपासून ‘आम्ही भारतीय लोक’ हे अभियान सुरु करत आहे. साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन हे अभियान सुरु होईल. त्यानंतर राज्यभरात हे अभियान चालविणार आहे. यामूधन हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्यांना आव्हान दिले जाईल.

त्याचबरोबर संविधानावर आक्रमण करुन भाजपने धुडगूस घातला आहे. यालाही थांबविण्याची गरज आहे. कारण, हिंदू राष्ट्र कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही. भाजपनेही लोकांची फसवणूक करण्याचा धंदा बंद करावा.

भोंग्याला हात लावाल तर..राज ठाकरे यांनी देश, समाजासाठी काय केले ? ते नकलाच करतात. भोंग्यावरुन बोलतात. हे भोंगे आता लागले आहेत का ? ‘कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे हे काम करत आहेत. आजोबांकडून त्यांनी काही तरी शिकायला हवे होते. भोंग्याला हात लावाल तर त्याला प्रतिकार करण्यात येईल. कारण, देशात आज १९४८ साला सारखी परिस्थिती आहे. संघाला देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का ? असा सवालही माने यांनी पत्रकार परिषदेत केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे