शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

मोबाईलमुळं हरवलं सुटीतलं बालपण, मुलं तासन्तास नेटवर : रानावनातील मजा ठरलीय दुरापास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:09 PM

सुटीची मज्जाच आजकाल मोबाईलच्या, आॅनलाईनच्या जमान्यात हरवून गेल्यानं मामाचा गावसुद्धा असून परका झालंय, मौज मस्ती, रानावनात फिरणं सर्वच दुरापास्त होऊन गेलंय, जणू बालपणच पुन्हा जीवन शोधण्याची व आठवण्याची फक्त एक आठवणच राहणार आहे, आजची पिढी मोबाईलच्या विश्वात एवढी व्यस्त झालीय की त्याची उन्हाळी सुटीतील आपलं बालपणसुद्धा विसरलंय.

ठळक मुद्देमोबाईलमुळं हरवलं सुटीतलं बालपण, मुलं तासन्तास नेटवर रानावनातील मजा ठरलीय दुरापास्त

दिलीप पाडळेपाचगणी : सुटीची मज्जाच आजकाल मोबाईलच्या, आॅनलाईनच्या जमान्यात हरवून गेल्यानं मामाचा गावसुद्धा असून परका झालंय, मौज मस्ती, रानावनात फिरणं सर्वच दुरापास्त होऊन गेलंय, जणू बालपणच पुन्हा जीवन शोधण्याची व आठवण्याची फक्त एक आठवणच राहणार आहे, आजची पिढी मोबाईलच्या विश्वात एवढी व्यस्त झालीय की त्याची उन्हाळी सुटीतील आपलं बालपणसुद्धा विसरलंय.उन्हाळी सुटी म्हटली की बालचमू हरकून जायचा, ती एक वेगळीच मज्जा होती. केव्हा एकदा परीक्षा होतीय आणि कधी एकदा धमाल करायला मिळतेय, असं वाटायचं. गावगावीच्या जत्रा करायच्या, आठ-दहा वर्षांपूर्वी तर लग्नाला जायचं ते वऱ्हाडी बनून बैलगाडीतून, भर दुपारी नदी विहिरीवर तासन्तास पोहण्याचा आनंद घ्यायचा. पाचगणी परिसरात तर डोंगरकपारीतून दिवसभर फिरायचं.

जांभूळ, आंबे, करवंद, टेमबुर्ण यासारखी फळ घरी न आणता रानातच शेतात खड्डा खणून मातीत पुरायची, त्यावर पुन्हा मातीचा ढिगारा लावून आडी करायची. रानातच फळ पिकवून खायची, रानावनात भटकंती करायची, झाडांवर कोठे मधाचा पोळ दिसतंय का पाहायचं, झाडांच्या सानिध्यातच सुरपाट्या खेळत बसायचं. मामाच्या गावाला पण जायचं, हेच बालपण मोबाईलच्या जमान्यात दिसेनासं झालंय.आताची लहान मुलांची बालपणांची गोडीच मोबाईलने हिरावून घेतलीय. मनसोक्त, मनमुराद, बालपणातील खोडकर धमाल, मस्ती मोबाईलच्या आॅनलाईन जमान्यानं दूर केली आहे. सदैव ही पिढी मोबाईलमध्ये हरवून गेल्याची पाहावयास मिळत आहे.खोड्या, दंगा मस्ती गेली कुठे?नेटन हरवलंय बालपण, देईल कोण शहाणपण, असं म्हणण्याची वेळ या पिढीवर येऊ शकते. आज शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हीच परिस्थिती दिसत आहे.

उन्हाळी सुटीची मज्जा, बालपणीच्या खोडकर दंगा, मस्ती न घालविता बालपणच हरवून स्वत:ला मोबाईलच्या नेटमध्ये गुंतवून घेतेय आणि विसरून जातेय की पुन्हा पुन्हा नाही येत ही बालपणीचं जीवन, त्यात खूप रंग भरायचे असतात, तेच रंग उभ्या आयुष्यात आठवणींची शिदोरी म्हणून जपून ठेवायची असतात. तीच आठवण उद्या भावी आयुष्यात, अचानक उतारवयात नजरेसमोर एक यादगार आठवण देणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूरchildren's dayबालदिन