शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

Satara: मुले, सुना सांभाळत नाहीत, वृध्देची तक्रार; पोलिसांनी चौघांना घेतलं ताब्यात 

By नितीन काळेल | Published: November 10, 2023 6:47 PM

न्यायालयाच्या अटक वॉरंटनंतर होते फरार 

सातारा : मुले आणि सुना सांभाळत नसल्याच्या कारणावरुन पिंपरे बुद्रुकच्या वृध्देने न्यायालयात केस दाखल केली होती. यामध्ये न्यायालयाच्या अटक वाॅरंट नंतर फरार झालेल्या चाैघांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच अटक केल्यानंतर त्यांना मुंबईतील विक्रोळी न्यायालयातही हजर करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरे बुद्रुक येथील ताराबाई ज्ञानदेव शिंदे (वय ७५) यांना प्रताप शिंदे आणि विजय शिंदे ही दोन मुले तसेच दोन सुनाही आहेत. हे सर्वजण सांभाळ करत नसल्याने त्या मुंबईत मुलीकडे आश्रयाला आहेत. याबाबत त्यांनी विक्रोळी न्यायालयात काैटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत केस दाखल केली होती. यामध्ये न्यायालयाने ताराबाई शिंदे यांच्या मुला आणि सुनांविरोधात जप्ती, अटक वाॅरंट काढले होते. हे वाॅरंट निघाल्यानंतर संबंधित फरार झाले. तसेच ते कोठेही मिळून येत नव्हते.

दि. ८ नोव्हेंबर रोजी प्रताप आणि विजय शिंदे हे दोघेजण घरी आल्याबाबतची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हवालदार धनाजी भिसे यांच्यासह स्टाफने दोघांना ताब्यात घेतले. तर त्यानंतर दोघांच्याही पत्नीला अटक करण्यात आले. या सर्वांना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तर सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, सहायक फाैजदार रमेश वळवी, हवालदार धनाजी भिसे, हवालदार योगेश कुंभार, नितीन भोसले, विठ्ठल काळे, अश्विनी माने, संजय चव्हाण आदींनी कारवाईत सहभाग घेतला.घरी आल्याचे समजताच कारवाई...मुलांनी आणि सुनांनी काैटुंबीक हिंसाचार केल्याने ताराबाई शिंदे यांनी विक्रोळी न्यायालयात केस दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने चाैघांच्या विरोधात जप्ती आणि अटक वाॅरंट काढलेले. तेव्हापासून चाैघेजण फरार झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांचा तपास लागत नव्हता. पण, संबंधित पिंपरे येथील राहत्या घरी आल्याचे समजताच पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस