परिस्थितीशी चार हात करत विविध क्षेत्रे काबीज केलेल्या असवलेवाडीच्या काही मंडळींनी स्थापन केलेल्या या ट्रस्टमार्फत विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. गावच्या प्राथमिक शाळेसमोर रंगमंच उभारण्याचा अलीकडेच शाळेकडून आलेला प्रस्ताव ट्रस्टने तत्काळ मंजूर केला. माजी सरपंच रामचंद्र असवले, सेवानिवृत्त पोलीसपाटील कृष्णत असवले आदींसह ग्रामस्थांच्या देखरेखीखाली त्याचे बांधकाम करण्यात आले. येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या हस्ते रंगमंचाचे उद्घाटन झाले. ट्रस्टचे अध्यक्ष भीमराव असवले, सचिव मधुकर असवले, खजिनदार लक्ष्मण कदम, ट्रस्टी मारुती असवले, प्रकाश कंक, सभासद सुरेश महिपती असवले, वसंत असवले, सुनील रामचंद्र असवले, बळीराम असवले, सत्यवान असवले, किरण पाटील, शत्रुघ्न असवले आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेला स्वखर्चाने ५० खुर्च्या भेट दिल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष भीमराव असवले व सचिव मधुकर असवले यांच्याबद्दल ग्रामस्थांनी कृतजता व्यक्त केली. यावेळी सहायक निरीक्षक संतोष पवार यांच्यासह रामचंद्र असवले, माजी विद्यार्थी शरद असवले, ऋषिकेश असवले, तुषार असवले, लक्ष्मण कदम आदींची भाषणे झाली. मुख्याध्यापक रामचंद्र मोरे यांनी स्वागत केले. महेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद सावंत यांनी आभार मानले.
फोटो : १४केआरडी०५
कॅप्शन : असवलेवाडी (ता. पाटण) येथे जिल्हा परिषद शाळेसमोर रंगमंच उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी भीमराव असवले, मधुकर असवले, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते.