फलटण : फलटणचे माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे पुत्र सह्याद्री कदम यांनी बुधवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष राबसाहेब दानवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी काळात तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.माजी आमदार चिमणराव कदम यांनी १५ वर्षे फलटण-खंडाळा मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या कार्याचा वारसा घेत त्यांचे पुत्र सह्याद्री कदम यांनी राजकारणात प्रवेश करून जाहीर कार्यक्रमांवर भर न देता घरगुती बैठका घेत गट मजबूत केला. सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राजकारणाची पुढील दिशा ठरविल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.मुबंई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांच्या उपस्थितीत सह्याद्री कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सह्याद्री कदम यांच्या भाजप प्रवेशाने फलटण तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलार आहेत, हे नक्की. (प्रतिनिधीराजकीय ताकद देणार : फडणवीस‘४० ते ५० वर्ष सातत्याने समाजसेवेचे व्रत घेऊन आपले कार्य साकारणाऱ्या दिवंगत चिमणराव कदम यांचे राजकीय व सामाजिक कार्य मोठे आहे. त्यांचे विधानसभेतील काम उत्कृष्ट व गाजलेले होते. त्यांचा वारसा सह्याद्री कदम जपत असून, त्यांच्या कार्याला सहकार्य करून मोठी राजकीय ताकद त्यांना देणार आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. फलटण तालुक्याच्या राजकारणात उतरत असताना माझा कोणाला विरोध आहे म्हणून उतरणार नसून माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांनी गोरगरीब जनतेशी ठेवलेली बांधिलकी, जनतेच्या हितासाठी सातत्याने केलेला संघर्ष याची जाणीव ठेवूनच तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. माजी आ. चिमणराव कदम यांच्या स्वप्नातील फलटणचा विकास साधणार आहे. भाजपच्या माध्यमातून सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण केली जातील.- सह्याद्री कदम
चिमणरावांचे सुपुत्र भाजपात
By admin | Published: September 14, 2016 10:13 PM