शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

कऱ्हाड, पाटण, कोरेगावात ‘अर्थ-शिक्षण’साठी चुरस

By admin | Published: March 29, 2017 11:38 PM

बारामतीची अपेक्षा : आमदारांनी आपापसांत चर्चा करून निर्णय घ्यावा

सातारा : जिल्हा परिषदेतील शिक्षण, अर्थ या समितीला विशेष दर्जा आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्यांनी आता या समितीवर निवड व्हावी, यासाठी आग्रह धरला आहे. कऱ्हाड, पाटण, कोरेगाव या तीन तालुक्यांतील चर्चेत असणाऱ्या सदस्यांमध्ये सध्या चुरस पाहायला मिळते आहे.जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी जितकी उत्सुकता होती, तितकीच सभापती निवडीचीही उत्सुकता ताणली गेली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ६४ पैकी ४० सदस्य निवडून आले आहेत. सभापती निवडी १ एप्रिल रोजी आहेत. गुरुवारीही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते तालुक्यांचा ‘बॅलन्स’ कसा साधतात याची उत्सुकता आहे.जिल्हा परिषदेतील शिक्षण व अर्थ, कृषी, समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण या चार समित्यांचे सभापती निवडीच्या हालचाली सध्या गतिमान आहेत. महिला व बालकल्याण समितीवर दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्नुषा भारती पोळ यांना संधी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या सर्वच नेतेमंडळींचे एकमत झाले आहे. परंतु इतर तीन समित्यांसाठी वाई, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण या मतदार संघांतील आमदारांनी जोर लावला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी जिल्ह्यातील आमदारांची मुंबईत बैठक घेतली. १२ सदस्यांना आपण सभापतिपदांवर संधी देऊ शकतो, याचा पुनरुच्चार आमदार पवार यांनी या बैठकीत केला. फलटणला अध्यक्षपद, सातारा-जावळीला उपाध्यक्षपद मिळाले असल्याने या दोन तालुक्यांतून नेत्यांचा आग्रह थांबला आहे. माण तालुक्यालाही सभापतिपद निश्चितपणे मिळणार आहे. मात्र, कऱ्हाड, वाई, कोरेगाव, पाटण या मतदार संघांनाही संधी देण्यासाठी आमदार मंडळी या बैठकीत आग्रही राहिले. आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी यासाठी जोर लावला आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ही महत्वपूर्ण बैठक सुरू राहिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.मतदार संघातील इच्छुक सदस्यांना सभापतिपद मिळावे, यासाठी सर्वच आमदार आग्रही राहिले. शेवटी आमदारांनी आपापसांत चर्चा करून बारामतीला निर्णय कळवावा, अशी सूचना आमदार पवार यांनी केली. बारामतीतून खासदार शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)