फलटण : फलटण शहरामध्ये आफ्रिकेतील युगांडा येथून आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या चौघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याच्या शक्यतेने शहरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.पॉझिटिव्ह आलेले हे एकाच कुटुंबातील चौघेजण त्यामध्ये पती, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. ते काल परदेशातून फलटण मध्ये आले होते. याची माहिती प्रशासनाला समजताच त्यांनी त्यांच्या कोरोना टेस्ट केल्या होत्या. त्याचा रिपोर्ट आज दुपारी पॉझिटिव्ह आला असून त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली का नाही? याची शक्यता प्रशासन पडताळून पाहत असून त्यांचे रिपोर्ट मुंबई, पुण्यात प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत.दिनांक 9 डिसेंबर रोजी आफ्रिकेतील युगांडा वरून हे चौघेजण मुंबईला आले होते. त्यावेळी विमानतळावर उतरल्यावर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तरीसुद्धा त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला होता. यानंतर काल ते फलटणला येऊन होम आयसोलेट झाले होते. प्रशासनाने त्यांचे काल स्वॅब घेतले होते. आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.प्रांताधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप यांनी तातडीने प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कडक उपायोजना करण्याचे आदेश दिले आहे. या घटनेची आज नागरिकांना माहिती समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले गेले आहे. आफ्रिकेतील युगांडा हा देश असल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे
युगांडाहून फलटणला आलेले चौघे जण पॉझिटिव्ह, ओमायक्रॉनची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 6:04 PM